Nashik News : हॉकर्स धारकांकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण

Bhadrakali Police taking action against unauthorized encroachers in Shalimar area.
Bhadrakali Police taking action against unauthorized encroachers in Shalimar area. esakal
Updated on

Nashik News : दोन हॉकर्स धारकांकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी (ता. १७) घडला.

घटना घडल्यानंतर महापालिकेने दुर्लक्ष केलेल्या अनधिकृत हॉकर्सधारकांचे अतिक्रमण भद्रकाली पोलिसांकडून काढण्यात आले.

अचानक धावपळ उडाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Woman policeman assaulted by hawkers nashik news)

भद्रकाली पोलिस ठाण्यात नियुक्त महिला कर्मचारी शालिमार भागातून जात असताना संशयित गुफरान शेख (१९, रा. खडकाळी) आणि त्याच्या अल्पवयीन सहकार्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीस कट मारला. त्यांनी संशयीतांना जाब विचारला असता, दोघांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

सर्व पोलिस ओळखीचे आहेत, कुणी काही करू शकणार नाही, असे म्हणत संशयितांनी त्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयित गुफरान सराईत आहे.

शालिमार भागातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हॉकर्सधारकांकडून नेहमी नागरिकांबरोबर अशाप्रकारे वाद घालण्याच्या घटना घडत असतात. शनिवार (ता. १७) चक्क त्यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याशीच वाद घालत त्यांना मारहाण केली. यासंदर्भात संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhadrakali Police taking action against unauthorized encroachers in Shalimar area.
Sakal Training : व्यावसायिक मधमाशीपालन, फायदे, व्यवसाय संधी; दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण

दरम्यान, सायंकाळी पोलिसांनी शालिमार भागातील सर्व अनधिकृत होकर्सधारकांचे अतिक्रमण काढत त्यांना पिटाळून लावले. हॉकर्सधारकांची मोठी धावपळ उडाली. तर, काही हॉकर्सधारकांकडून नाराजी व्यक्त केली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईने संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त झाला. शालीमार रस्त्याने मोकळा श्वास घेतला. वाहनचालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

महापालिकेचा नाकर्तेपणा

महापालिकेकडून येथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दिवसेंदिवस येथील अतिक्रमणात वाढ होत आहे. त्यातूनच त्यांची मुजोरीदेखील वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहे. काही महिन्यांपूर्वीही एकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे शेवटी शनिवारी पोलिसांना महापालिकेचे काम करावे लागले. त्यांनी येथील अनधिकृत अतिक्रमण काढले.

Bhadrakali Police taking action against unauthorized encroachers in Shalimar area.
Police Combing Operation : शहरात टवाळखोरांविरोधात पोलिसांचा दंडुका; कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतर्कता

लाठीचार्जची अफवा

पोलिस येथील अतिक्रमण काढत असताना एका दुचाकीवर तीन तरुण वेगात वेगात दुचाकी चालवत नागरिक तसेच पोलिसांना शिवीगाळ करत होते. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांना थांबविण्यासाठी लाठी उगारताच त्यातील दोघांनी दुचाकी सोडून पळ काढला. तर एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. लाठी उगारल्याचे बघता शालिमार भागात लाठी चार्ज झाल्याची अफवा पसरली.

"शालिमार भागात अनधिकृत अतिक्रमणधारकांची मुजोरी वाढत चालली आहे. घडलेल्या घटनेनंतर येथील अनधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही महापालिकेच्या माध्यमातून येथील अनधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जाईल." - दिलीप ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली

Bhadrakali Police taking action against unauthorized encroachers in Shalimar area.
Anjaneri Brahmagiri Rope Way : अंजनेरी ते ब्रह्मगिरी 5 किलोमीटरचा रोप वे : हेमंत गोडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.