Nashik News: महिला शेतकऱ्यांनी बनविले 15 हजार लिटर सेंद्रीय जीवामृत स्लरी!

खतवडला गोदरेज ॲग्रोवेट, वॉटरशेड ऑरगनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून पाणी कारभारी प्रकल्प
Women farmers made 15 thousand liters of organic dead slurry
Women farmers made 15 thousand liters of organic dead slurryesakal
Updated on

वणी : दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे गोदरेज ॲग्रोवेट व वॉटरशेड ऑरगनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून पाणी कारभारी प्रकल्पांतर्गत प्रकल्प अधिकारी नवनाथ पाचारणे, अभियंता सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसरपंच सुकदेव खुर्दळ यांच्या संकल्पनेतून सेंद्रिय शेतीसाठी एकाच वेळी एकाच दिवशी ७८ महिला शेतकऱ्यांनी सुमारे पंधरा हजार लिटर सेंद्रीय जीवामृत (स्लरी) बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. (Women farmers made 15 thousand liters of organic dead slurry Nashik News)

खतवड येथे पाणी कारभारी प्रकल्पांतर्गत गोदरेज कंपनीच्या फंडामधून व वॉटरशेड ऑरगनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून सहा सिमेंट बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे व दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

गरजू शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात ड्रीप, मल्चिंग पेपर, गांडूळ खतनिर्मिती बेड व दहा शेतकऱ्यांच्या शेतात फळबाग योजना राबविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व विषमुक्त शेतीसाठी गोमूत्र, देशी गाईचे शेण, गुळ, बेसन पीठ, वारूळाची मातीपासून कमी खर्चात सेंद्रीय जीवामृत स्लरी बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

Women farmers made 15 thousand liters of organic dead slurry
NMC News: महापालिकेची अतिक्रमण कारवाई; अन् अतिक्रमण विभागाच्या हाती भोपळा

पाणी कारभारी प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून प्रत्येकी २०० लिटर एक टीप, एक किलो गूळ व दोन किलो बेसन पीठ उपलब्ध करून देण्यात आले.

खतवड ग्रामपंचायतचे उपसरपंच सुकदेव खुर्दळ यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमाला महिला शेतकीयांनी भरभरून प्रतिसाद देत सहभाग नोंदवला व रासायनिक औषधी फवारणीचा वापर कमी करून सेंद्रीय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

सरपंच बबन दोबाडे, प्रकल्पाचे नीलेश पगारे, युवराज साळवे, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पुंजा मुळाणे, ग्रामविकास अध्यक्ष सचिन खुर्दळ, पाणी कारभारी मंडळाचे अध्यक्ष संजय हिरे, सदस्य मंडळ, वसुंधरासेवक हरिसिंग माळेकर, अमोल खुर्दळ, सारिका गवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Women farmers made 15 thousand liters of organic dead slurry
Nashik News: ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार! दिंडोरीच्या गटविकासाधिकारी नम्रता जगताप यांचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()