women invitational cricket competition : अनन्या साळुंखे नाशिकची कर्णधार

Ananya Salunkhe
Ananya Salunkheesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट लीग स्‍पर्धा होत आहेत. नाशिकला उद्या (ता.४) पासून ही स्‍पर्धा खेळविली जाणार आहे. स्‍पर्धेत अनन्‍या साळुंखे ही नाशिक जिल्‍हा संघाचे नेतृत्‍व करणार आहे. (women invitational cricket competition Ananya Salunkhe captain of Nashik Nashik Latest Marathi News)

Ananya Salunkhe
पाण्यातून वाट शोधत, 'शाळेला चाललो आम्ही'; मिरगाव येथील विद्यार्थ्यांची परवड

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाच गटात एकूण २० संघात ही राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे. टी-ट्वेंटी स्वरुपात खेळविल्या जाणार्या स्पर्धेत नाशिकच्या ‘अ’ गटात सांगली, नंदुरबार व नांदेड जिल्‍हा संघांचा समावेश आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक विरुद्ध सांगली सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा सामना नंदुरबार विरुद्ध नांदेड यांच्‍यात होणार आहे.

नाशिक जिल्‍हा संघात अनन्या साळुंके (कर्णधार), ऐश्वर्या वाघ, शाल्मली क्षत्रिय, प्रणाली शिंदे, पल्लवी बोडके, श्रुती गिते, प्रियंका पवार (यष्टीरक्षक), सिद्धी पिंगळे, निशी छोरिया, कार्तिकी देशमुख, हर्षाली मोरे, गौरी गुप्ता, निकिता मोरे, आस्था संघवी यांचा संघात समावेश आहे.

तर निधी भुतडा, इव्हा भावसार, कार्तिकी गायकवाड, अस्मिता खैरनार, वैभवी बालसुब्रमणीयम या राखीव खेळाडू आहेत. प्रशिक्षक भावना गवळी व डॉ. भाविक मंकोडी आहेत. चांगल्या कामगिरीसाठी जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी संघाला शुभेच्‍छा दिल्‍या.

Ananya Salunkhe
State Level Invitational Cricket Tournament : सुपर लीगसाठी साहिल पारख कर्णधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.