Nashik : अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांचा दिक्षी ग्रामपंचायतीवर मोर्चा

Presented a statement to Sarpanch Sangeeta Chaudhary and Ozar Police Inspector Ashok Rahate
Presented a statement to Sarpanch Sangeeta Chaudhary and Ozar Police Inspector Ashok Rahateesakal
Updated on

ओझर (जि. नाशिक) : ओझर येथून जवळच असलेल्या दिक्षी गावात सूरू असलेली अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी करत गावातील सुमारे १०० आदिवासी महिलां तसेच आदिवासी शक्ती सेनेचे कार्यकर्ते यांनी मोर्चा काढत सदर धंदे त्वरित बंद करा अशी मागणी दिक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता चौधरी व ओझर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांंना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. (Women march on Diksha Gram Panchayat to stop sale of illegal liquor Nashik Latest Marathi News)

दिक्षी गांवात अवैध दारू गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारू विक्री केली जाते. अनेकदा ग्रामस्थांनी या संदर्भात निवेदने दिली असुन यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. या बेकायदेशीर दारू विक्री अड्डयावर दारू पिऊन अनेक कुटुंब उध्वस्त झाले असुन, देशोधडीला लागले आहेत.

या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी शालेय विद्याथी जात सुध्दा जात असल्याने विद्यार्थी सुदधा व्यसनाधीन होत आहे. अनेकदा ग्रामस्थांनी सदर बेकायदेशीर धंद्याबाबत ओझर पोलिस ठाण्यात तोंडी तक्रारी केल्या, पण या विषयावर पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला, तसेच संबंधित व्यावसायिकाना गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनि समजून सांगितले असता तुमच्यावर जातीवदाचा गुन्हा दाखल करू, आम्ही वर पर्यंत हप्ते देतो, आमचे कोणीही काही करू शकत नाही.

या भाषेत त्यांना दम देण्यात आल्याचा किस्सा उपस्थित नागरिकांनीपैकी एकाने पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या समोर सांगितला. नक्की कोणाच्या वरदहस्ता मुळे हे धंदे चालता याचा शोध लावणे महत्वाचे आहे, तसेच ही बेकायदेशीर दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात नाही आली तर आम्ही कायदा हातात घेत संबंधित दारू विक्री करणाऱ्यांना चोप देऊ असा इशारा उपस्थित महिलांनी आदिवासी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा दिला.

याप्रसंगी सरपंच संगीता चौधरी आदिवासी शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, जेष्ठ नेते साहेबराव चौधरी, दिक्षी सोसायटीचे चेअरमन वसंत चौधरी दौलत चौधरी, रंगनाथ गांगुर्डे, राजेंद्र धुळे, एकनाथ चौधरी आदिवासी शक्ती सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत कडाळे. महिला,ग्रामस्थ आदिवासी शक्ती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Presented a statement to Sarpanch Sangeeta Chaudhary and Ozar Police Inspector Ashok Rahate
Nashik : पंचवटी विभागात NMCकडून 341 मूर्ती संकलन

"दिक्षी गावात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री मुळे दिवसभर शेतात मोलमजुरी करनारा शेतमजूर आपली दिवसभराची मजुरी ही दारू पिण्यात घालवतो तसेच दारू पिऊन घरातील महिलेला मारहाण करतो यामुळे महिलांचा असंतोष वाढला त्यांनी आज कायदेशीर मार्गी आंदोलन केले पण जर संबंधित धंदे बंद नाही झाले तर याच तीव्र आंदोलन करणार"

- अर्जुन गांगुर्डे, संस्थापक अध्यक्ष, आदिवासी शक्ती संघटना

"आम्ही स्थानिक पातळीवर प्रयत्न केला पण स्थानिक पोलिस प्रशासनाने लक्ष दिले नाही म्हणून आज ह्या महिलाना मोर्चा काढावा लागला यापुढेही पोलीस प्रशासनने याची दखल घेतली नाही तर ग्रामस्थ कायदा हातात घेतील.व लवकरच या विषयासंदर्भात नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील याची भेट घेणार आहोत" - संगीता चौधरी, सरपंच ग्रामपंचायत दिक्षी

Presented a statement to Sarpanch Sangeeta Chaudhary and Ozar Police Inspector Ashok Rahate
सोनांब्याच्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; गुरदरी पाझर तलाव फुटण्याचा धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.