Pink Auto Rickshaw: ‘पिंक रिक्षा’चा पहिला मान नाशिकला! उपक्रम 4 वर्षांनी ठरणार फलदायी

women of Nashik are likely to get chance of driving pink rickshaw first news
women of Nashik are likely to get chance of driving pink rickshaw first news
Updated on

Pink Auto Rickshaw : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्यातील दहा शहरांमध्ये पिंक रिक्षा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात नाशिक शहराचादेखील समावेश राहणार आहे.

नाशिक महापालिकेने यापूर्वीच महिलांना ‘पिंक रिक्षा’ चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याने रिक्षा चालविण्याचा मान नाशिकच्या महिलांना आधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९ मध्येच पिंक रिक्षाचा राबविलेला उपक्रम चार वर्षांनी फलदायी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कालांतराने रिक्षामध्ये प्रवास करण्याकडे कल वाढला. (women of Nashik are likely to get chance of driving pink rickshaw first news)

परंतु रिक्षांमध्येदेखील महिला प्रवासी सुखरूप प्रवास करू शकतं नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे झारखंड सरकारने देशात प्रथम पिंक रिक्षा उपक्रम सुरू केला.

महिलांना सुरक्षित प्रवास देण्याच्या हमीबरोबरच रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश त्यामागे होता. २०१२ मध्ये रांची शहरात सरकार पुरस्कृत २०० पिंक रिक्षा सुरू झाल्या. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर गुजरात सरकारने सुरत शहरात रिक्षा सुरू केल्या. पिंक रिक्षा घेण्यासाठी सात टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच २५ टक्के सबसिडीदेखील दिली.

आसाम राज्यातील बोंगईगाव येथे नॅशनल अर्बन लाईव्हली हूड मिशनकडून १३ पिंक रिक्षा सुरू करण्यात आल्या. ओरिसा राज्यात पाठोपाठ गुरगावमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात आल्या. आता महाराष्ट्र राज्यातील दहा शहरांमध्ये पिंक रिक्षा सुरू केल्या जाणार आहेत.

यात पहिल्या टप्प्यात नाशिकसह मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या दहा शहरांमध्ये पिंक रिक्षा उपक्रम राबविला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात दिल्या.

women of Nashik are likely to get chance of driving pink rickshaw first news
Nashik Cylinder Blast: सिलिंडरच्‍या स्‍फोटाने हादरला गंगापूर रोड; परिसरातील सदनिका, वाहनांचेही मोठे नुकसान

कोरोनानंतर प्रशिक्षण रखडले

नाशिक महापालिका हद्दीत २०१९ मध्ये पहिली पिंक रिक्षा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी घेतला होता. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात पिंक रिक्षासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आली. प्रशासनाकडून जवळपास १०० महिलांना विजय मोटार ड्रायव्हिंग स्कूलमार्फत प्रशिक्षण व परवाना देण्यात आला. कोरोनानंतर प्रशासनाकडून प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला गेला नाही.

प्रशिक्षणार्थी महिलांपैकी काही महिलांनी सीएनजी इंधनावरील रिक्षा घेऊन उदरनिर्वाह सुरू केला. आता पिंक रिक्षासाठी शासन स्तरावरूनच परवानगी दिली जात असल्याने तांत्रिक व कायदेशीर अडचणी सुटणार आहे. पिंक रिक्षा चालविण्यासाठी प्रशिक्षित महिला वर्ग तयार असल्याने या अर्थाने नाशिक महापालिकेने पिंक रिक्षाचा पहिला मान आधीचं मिळविला आहे. आता शासनाकडूनच परवानगी मिळणार असल्याने पिंक रिक्षाचा मान प्रथम नाशिकच्या पदरात पडणार आहे.

काय आहे पिंक रिक्षा?

पिंक रिक्षा योजना फक्त महिलांसाठी आहे. महिला सुरक्षेसह रोजगार निर्मितीचा उद्देश यामागे आहे. या रिक्षात पॅनिक बटण व जीपीएस यंत्रणेची व्यवस्था असते. या रिक्षात चालक व प्रवासी महिलाच असतात.

"महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी तसेच रोजगार निर्मितीचा भाग म्हणून २०१९ मध्ये स्थायी समिती सभापती असताना उपक्रम राबविला. त्याचा लाभ अनेक महिलांना मिळाला. आता अधिकृत पिंक रिक्षा चालविण्यासाठी शासन पुढाकार घेत असल्याने त्याचा प्रशिक्षणार्थी महिला तयार असल्याने पहिला लाभ नाशिकला मिळाला पाहिजे." - हिमगौरी आहेर-आडके, माजी स्थायी समिती सभापती.

women of Nashik are likely to get chance of driving pink rickshaw first news
Nashik Trimbakeshwar Mandir: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टचे उत्पन्न 25 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.