पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्चाराचा आरोग्‍यावर सकारात्‍मक परिणाम

Female Priestess Angha Jayde
Female Priestess Angha Jaydeesakal
Updated on

नाशिक : आपल्‍या संपूर्ण व्यक्तिमत्त्व तसेच आरोग्‍य, विकास यावर अतिशय सकारात्‍मक परिणाम मंत्रोच्चाराने होत असतो. प्रत्‍येकाने मंत्र, स्‍तोत्रपठण केले पाहिजे.

त्‍याचा आपल्‍या आयुष्‍याच्या प्रवासात खूप छान अनुभव आपणाला येतो, अशी माहिती महिला पुरोहिता अनघा जायदे यांनी दिली. (Women rule in priesthood Female Priestess Anagha Jayde nashik Latest Marathi News)

अनघा जायदे यांचे माहेर बेळगाव येथील व सासर पुण्याचे. सासरी पूजाअर्चा, सोहळेओवळे यांचे कटाक्षाने पालन होते. पूजा सांगण्यासाठी येणारे गुरुजी, तसेच त्‍यांचे कुटुंबीयांबरोबर खूप रमत असे. पती सीडीओ मेरीत इंजिनिअर.

त्‍यामुळे नाशिकला स्‍थायिक झाले. कौटुंबिक चढ-उतारात मुलगी आजारी असताना, उपचाराबरोबरच मी तिच्याजवळ बसून मंत्रोच्चाराचे पठण करीत असे. याबाबत मला मैत्रीण स्मिता आपटे हिने सांगितले होते.

त्‍याचा सकारात्‍मक परिणाम जाणवेल, असेही मैत्रीण आपटे हिने सांगितले होते आणि खरेच तसे झाले. मग तिच्याकडून एक वर्षाचे पौरोहित्याचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या पन्नाशीनंतर पौरोहित्‍य शिक्षणाचा प्रवास म्‍हणजे १९९८ पासून सुरू झाला.

Female Priestess Angha Jayde
Nashik Crime : बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास

घरातून या शिक्षणासाठी प्रोत्‍साहनच मिळाले. घरासाठीही वेळ देत असल्‍याने अडचण कधी जाणवली नाही. दुगलताईंच्या मार्गदर्शनाखाली वैदीक मंत्राचे शिक्षण घेतले. ताईंनी आपापल्‍या भागांत वर्ग सुरू करून इतर महिलांपर्यंत ज्ञान पोचवा, असा संदेश दिला.

त्‍याप्रमाणे कॉलेज रोड येथे वर्ग घेत आहे. वैदिक मंत्रांचा दुगल यांच्या स्‍वतःच्या आरोग्‍यावर सकारात्‍मक परिणाम झाला. संधिवात असतानाही औषध न घेता त्‍यावर त्यांनी नियंत्रण मिळविले आहे. म्‍हणूनच सर्वांनी रामरक्षा विष्‍णुसहस्रनामाचे पठण अवश्‍य करावे.

त्‍याचा आपल्‍या स्‍वतःवर व आरोग्‍यावर सकारात्‍मक परिणाम होतो, आत्‍मविश्‍वास दृढ होतो. एके ठिकाणी सीए झालेला मुलगा पूजेसाठी बसला असता, त्‍याला पूजा करतानाच्या पेहरावाविषयी सांगितले. तसा पेहराव करून त्‍याने पूजा केली.

त्‍या कुटुंबाचा विश्‍वास इतका दृढ आहे, की गेल्‍या १२ वर्षांपासून दर वर्षी सत्‍यनारायण व अन्य पूजा त्‍यांच्‍यामार्फत केली जात आहे. आजही त्‍यांचे ७२ वर्षे वय असतानाही उत्‍साही व प्रसन्न आहेत. हा सर्व मंत्राचा प्रभाव आहे.

Female Priestess Angha Jayde
Nashik : पाणीगळतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.