पौरोहित्‍यातही महिलाराज : श्रोत्‍यांची प्रतिक्रिया उमेददायी, प्रोत्‍साहनपर

Female Priest madhuri joshi
Female Priest madhuri joshiesakal
Updated on

नाशिक : वयाच्या पंचेचाळीशीनंतर पौरोहित्‍याचा प्रवास सुरू झाला. लहानपणापासूनच आवड होती वृत्तपत्रात राणी भवन येथे महिला मंत्रोच्चार व वैदिक वर्ग घेतले जातात, याबाबत वाचण्यात आले व तेथून प्रवासास सुरवात झाली.

माधुरी जोशी यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना त्‍यांनी आपल्या प्रवासात आलेले सकारात्मक अनुभवाचे वर्णन केले. (Women rule in priesthood madhuri joshi nashik latest marathi news)

माधुरी जोशी यांचे माहेर औरंगाबाद येथील, तर सासर नाशिकचे. माहेरी व सासरी धार्मिक वातावरण असल्‍याने पाठातरांची आवड होतीच. वयाच्या ४५ व्या वर्षी राणी भवन येथे १९९७ मध्ये प्रवेश घेतला. पुराणोक्‍त व वेदोक्‍त मंत्र यातील फरक, बारकावे, अर्थाचे मूलभूत ज्ञान प्राप्त झाले. गोडी वाढत गेली.

वेदोक्‍त मंत्राचे शिक्षणासाठी श्रीमती दुगल व साने गुरुजींचे मार्गदर्शन लाभले. मंत्राचे ज्ञान स्‍वतःला म्‍हणता येणे याचा आनंद वेगळाच आहे. यातून मिळणारा दृढ आत्‍मविश्‍वास यामुळे आवड वाढतच गेली.

मुलांनाही प्राथमिक स्‍तोत्र, स्‍त्री सुक्‍त ज्ञान आहे. कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळत गेले. तसेच, कुटुंब जबाबदारी पार पाडून आवड जोपासण्याचा एक वेगळाच आनंद असतो. २००४ पासून तिसरे वर्ष रुद्रपठण वर्गात महिलांना राणी भवन येथे शिकविले.

Female Priest madhuri joshi
...तुमचे प्रमाणपत्र अवैध का ठरवू नये?; अपर जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस

यानिमित्त आपल्‍या हातून होणारे समाज कार्याचा आनंद होता. महिलाही छान तयार झाल्‍या. पौराहित्‍य करताना छान अनुभव आले. एके ठिकाणी बारा वर्षापासून लघुरुद्र ११ महिलांनी मिळून दरवर्षी असे बारा वर्षे केली.

त्‍या कुटुंबाची आमच्या प्रति निष्‍ठा तसेच प्रत्‍येक वर्षी येणारा सकारात्‍मक अनुभव यामुळे त्‍यांची श्रध्दा वाढत गेली. सामुदायिक पठण, गणेश याग, नवचंडी, मुंज लावणे या साऱ्या पूजेचा आनंद घेऊन यथासांग पूजा करून घेत असतो.

पौराहित्‍यानिमित्त डोंबिवली, पुणे, यावल अशाप्रकारे बाहेरगावी जाऊनही पूजा, शांती, रुद्रयाग यात सहभाग घेत असतो. तसेच महिला पूजा सांगणार म्‍हणून श्रोत्‍यांना कुतूहल असते. तसेच पूजा झाल्‍यावरच्या त्‍यांच्या प्रतिक्रिया प्रोत्‍साहन व उमेद देत असतात, असे माधुरी जोशी यांनी सांगितले.

Female Priest madhuri joshi
हरसूलमध्ये Leaf toed Gecko सरड्याचे दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()