Womens Day 2023 : पतीला नवजीवन देणाऱ्या आधुनिक सावित्रीचा सन्मान!

womens day 2023 Honoring  modern Savitri poonam gite who gives new life to her husband nashik news
womens day 2023 Honoring modern Savitri poonam gite who gives new life to her husband nashik newsesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : ऐन तारुण्यात पतीच्या दोन्हीही किडण्या (Kidney) निकामी झाल्यावर पतीला हिम्मत आणि स्वतःची किडनी देवून नवजीवन देण्याऱ्या धाडसी तरुणीचा संगमेश्‍वर परिसरातील साथी दत्ता वडगे पुस्तक पेढीतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. (womens day 2023 Honoring modern Savitri poonam gite who gives new life to her husband nashik news)

समाजातील बदलत्या विचारांमुळे महिला जनजागृती हळूहळू होत आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महिला कार्य करतात. अगदीच आदर्शवत असणाऱ्या अनेक महिला कानाकोपऱ्यात असतात. जुन्या व बुरसटलेल्या विचारांना त्यागून आपल्या पतीसाठी खऱ्या अर्थाने त्या ‘सावित्री’ ठरतात.

ओझर येथील हर्षल गिते या खासगी क्लास चालक शिक्षकाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यावर हर्षल यांच्या आई- वडिलांनी किडनी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, तपासणी अंती त्यांना तसे करता येणे शक्य नसल्याचे समजले. त्यामुळे हर्षल यांची पत्नी पूनम हर्षल गिते यांनी किडनी देण्याची तयारी करून तपासणी केली.

त्यांना किडनी देणे शक्य असल्याचे समजताच त्यांनी पतीला हिम्मत देऊन या आधुनिक सावित्रीने किडनी दान केली. शस्त्रक्रिया होऊन वर्ष दीड वर्ष झाले. त्यांच्या पतीची प्रकृती आता ठणठणीत आहे. त्यामुळे पतीला नवीन जीवन देणाऱ्या या ‘सावित्रीच्या लेकीचा’ संगमेश्‍वरातील कार्यकर्त्यांनी एका छोटेखाणी कार्यक्रमात पूज्य साने गुरुजी यांचे ‘शामची आई’ पुस्तक देवून व त्यांच्या धाडसी वृतीचे कौतुक करून सन्मान केला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

womens day 2023 Honoring  modern Savitri poonam gite who gives new life to her husband nashik news
Womens Day 2023 : एकत्र कुटुंब, संस्कारक्षम कुटुंब घडविणाऱ्या लढाऊ जिजाबाई!

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच पूनम गिते यांनी पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, त्याना नवीन आयुष्य देण्याचा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्‌गार सामाजिक कार्यकर्ते अशोक सावकार यांनी या वेळी काढले. साथी दत्ता वडगे पुस्तक पेढीचे अध्यक्ष राजीव वडगे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सावकार,

हिंदवी मंडळाचे आशिष ताजणे, त्रिशूळ मंडळाचे भास्कर वाणी, प्रकाश ताजणे, सचिन कैचे यांच्यासह हर्षल गिते यांचा संपूर्ण परिवार व नागरिक या वेळी उपस्थित होते. संतोष अहिरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अनोख्या सत्कार सोहळ्याचे शहर व परिसरात कौतुक होत आहे.

womens day 2023 Honoring  modern Savitri poonam gite who gives new life to her husband nashik news
Womens Day 2023 : नावीन्यतेतून उभा केला यशस्वी कॉस्मेटिक उद्योग; 'ति'ची यशोगाथा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.