Womens Day 2023 : नावीन्यतेतून उभा केला यशस्वी कॉस्मेटिक उद्योग; 'ति'ची यशोगाथा!

suchitra pande
suchitra pandeesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : आयुष्यात मिळालेली बहुमूल्य प्रेरणा म्हणजे स्त्री (Women) , या उक्तीप्रमाणे येथील सुचित्रा व्यवहारे-पांडे या उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहेत. (Womens day 2023 suchitra pande journey from an employee to successful entrepreneur nashik news)

यशस्वी व्यवसायासाठी शिक्षण, नावीन्य आणि समर्पण या मिलाफ कशारीतीने करता येतो, यासाठी त्यांचा प्रवास मार्गदर्शक ठरू शकणारा आहे. एक कर्मचारी ते यशस्वी उद्योजिका हा त्यांचा प्रवास ‘कॉस्मेटिक्स’ क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या महिलांसाठी उपयोगी असाच आहे.

सिन्नरचे माहेर असलेल्या सुचित्रा यांनी हर्बल कॉस्मेटिक्स क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले आहे. त्यांनी लोणी येथून केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यानंतर के. के. वाघ पॉलिटेक्निक नाशिक येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून सहा महिने काम केले.

त्याचप्रमाणे जनरल मिल्स इंडिया प्रा. लि. सिन्नर येथे उत्पादन कार्यकारी म्हणून एक वर्षाचा अनुभव घेतला आहे. यादरम्यान त्यांच्यातील उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच त्यांनी आपल्या सौंदर्यप्रसाधने या आवडत्या क्षेत्रातील नैसर्गिक आणि सुरक्षित सौंदर्यप्रसाधनांची वाढती मागणी पूर्ण करणारी अनोखी हर्बल उत्पादने विकसित करण्याचा निर्धार केला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

suchitra pande
Womens Day 2023 : लाचलुचपतच्या महिलाराज भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ

त्यांनी १४ मे २०११ ला ‘साची हर्बल्स’ नावाने हर्बल कॉस्मेटिक्स ब्रॅन्ड स्थापन केला. जो नैसर्गिक आणि सुरक्षित घटकांचा वापर करून बनविलेल्या उच्च दर्जाच्या हर्बल सौंदर्यप्रसाधनांसाठी ओळखला जातो. साची हर्बल्समध्ये उत्पादनांच्या श्रेणीमध्ये दोन प्रकारचे केसांचे तेल, दोन प्रकारचे उटणे आणि आयुर्वेदिक हेअर पॅक यांचा समावेश आहे.

ही सर्व उत्पादने नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केली जातात. जी कोणत्याही हानिकारक दुष्परिणामांशिवाय इच्छित परिणाम प्रदान करण्यासाठी सक्षम आहेत. अवघ्या दोन वर्षात हर्बल कॉस्मेटिक क्षेत्रात सुचित्रा यांनी उत्तम काम करत अगदी ठामपणे पाय रोवला आहेत.

कॉस्मेटिक इंडस्ट्रीजशी संबंधित अनेक अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. यात कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा कोर्स, धारणी फॉर्म्युलेशनचा स्कीन केअर आणि हेअर केअर कोर्स आणि ग्लॅमअप इन्स्टिट्यूटच्या हर्बल कॉस्मेटिक्सचा सर्टिफिकेट कोर्स आहे. या अभ्यासक्रमांमुळे त्यांना कॉस्मेटिक उद्योग, नवीनतम ट्रेड आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांची सखोल माहिती मिळविण्यात मदत झाली आहे.

‘साची हर्बल्स’ सतत नवनवीन संशोधन करत आहे आणि आपली उत्पादन श्रेणी वाढवत आहे. सुचित्रा सध्या तीन आगामी उत्पादनांवर काम करत आहेत. जे लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. नैसर्गिक आणि सुरक्षित घटक वापरण्याची ब्रॅन्डची बांधिलकी जपत या उत्पादनांनी ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राधान्याने पूर्ण करणे अपेक्षित आहे.

यशस्वी व्यवसायासाठी शिक्षण, नावीन्य आणि समर्पण कसे एकत्र केले जाऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. नैसर्गिक घटकांचा वापर आणि उच्च-गुणवत्तेची उत्पादने देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना विश्वासू ग्राहकांचा आधार मिळत आहे. हर्बल कॉस्मेटिक्स उद्योगात साची हर्बल्स विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते.

suchitra pande
Womens Day 2023 : एकत्र कुटुंब, संस्कारक्षम कुटुंब घडविणाऱ्या लढाऊ जिजाबाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.