Womens Day 2023 : लाचलुचपतच्या महिलाराज भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ

women officer succeeded in imprisoning 49 corrupt employees in anti corruption department nashik news
women officer succeeded in imprisoning 49 corrupt employees in anti corruption department nashik newsesakal
Updated on

नाशिक रोड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तेरा महिला कर्मचारी असून, जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईत या सर्वच महिला (Women) झाशीची राणी म्हणून लढत आहेत. (womens day 2023 women officer succeeded in imprisoning 49 corrupt employees in anti corruption department nashik news)

आजपर्यंत नाशिक विभागात ४९ भ्रष्टाचारी जेरबंद करण्यात या महिलाराजला यश आले असून, सर्वसामान्यांमध्ये या १३ महिला भ्रष्टाचाराबाबत प्रबोधन करीत आहेत. महसूल विभागासह पोलिस, भूमिअभिलेख, जिल्हा परिषद, वीज वितरण कंपनी याबरोबरच इतर सरकारी कार्यालयांमध्ये सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दरारा निर्माण झाला आहे.

जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ दरम्यान ४९ भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात नाशिकच्या महिलाराजने झाशीच्या राणीची कामगिरी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर व उपअधीक्षक वैशाली पाटील या नाशिक विभागात सामान्य माणसांमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी जनजागृती करीत आहे.

या विभागात पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील, निरीक्षक साधना भोये, साधना इंगळे, मीरा आदमाने, गायत्री जाधव त्याचप्रमाणे पोलिस नाईक ज्योती शार्दुल, शीतल सूर्यवंशी, क्षितिजा रेड्डी, वर्षा बागले, गायत्री कुलथे, जयश्री शिंदे आणि वनिता महाजन या महिलाराजने या विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

women officer succeeded in imprisoning 49 corrupt employees in anti corruption department nashik news
Womens Day 2023 : वारकरी पताका हाती घेत तिने स्वीकारला प्रबोधनाचा मार्ग; पहिल्या महिला कीर्तनकार..

"भ्रष्टाचारविरहित शासनाची नेमून दिलेली कामे व्हायला हवीत. विशेष करून ग्रामीण भागामध्ये भ्रष्टाचारसंबंधी आम्ही जनजागृती करीत आहोत. शासकीय कामाच्या मोबदल्यात कोणी पैसे मागत असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधल्यास भ्रष्टाचाराची कीड नाहीशी होईल. यात नागरिकांचे योगदान गरजेचे आहे." - शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

"भ्रष्टाचारासंबंधी माहिती मिळाल्यास अथवा कोणी नियमबाह्य सरकारी नोकर पैसे मागत असल्यास थेट आमच्याशी बोला. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, शिवाय भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यासंबंधी आम्ही जनजागृती करीत आहोत." - वैशाली पाटील, उपअधीक्षक

women officer succeeded in imprisoning 49 corrupt employees in anti corruption department nashik news
Womens Day Special : प्रत्‍येक क्षेत्रात कार्यरत स्‍त्रीचा सन्मान आवश्‍यक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.