NMC Swimming Pool : महापालिकेने सातपूर एमआयडीसीतील इएसआयसी मैदानाशेजारी करोडो रुपये खर्चून महिलासाठी स्वतंत्र जलतरण तलाव उभारला आहे. परंतु, एक वर्षापासून उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने जलतरण तलाव धूळखात पडून आहे.
उन्हाळा सुरु झाल्याने उद्घाटन होईल तेव्हा होईल, पण महिलांसाठी हा जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी महिलांनी केली आहे. (Womens Swimming Pool Awaits Opening Ignorance of nmc administration towards rightful income nashik news)
एका बाजूला महापालिका उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना, आटापिटा प्रशासन करत असताना मात्र स्वतःच्या व हक्काच्या उत्पन्नाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका प्रशासनाचा सध्याचा कारभार आंधळं दळत अन् कुत्रं पीठ खात’ असाच चालल्याचे समोर आले आहे.
माजी महापौर दशरथ पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरातील पंचवटी, सिडको, नाशिक रोड व सातपूरमध्ये नागरिकांसाठी जलतरण तलाव उभारले होते. सातपूरच्या या जलतरण तलावामुळे कधी नव्हे औद्योगिक कामगार व त्यांच्या भावी पिढीला पोहण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने विलक्षण आनंद होता.
पण त्या नंतरच्या काळात मात्र सातपूरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली तसेच तरण तलावाचे महत्त्व वाढले. त्यामुळे आहे तो जलतरण तलाव कमी पडू लागल्याने तसेच महिला- पुरुषांसाठी एकत्र सुविधा असल्याने महिलांची कुचंबणा होत होती.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव वर्षभरापूर्वी उभारण्यात आला आहे. पण या जलतरण तलावाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने हा पडून आहे. पण देखभालीवर मात्र खर्च सुरू आहे.
आता उन्हाळा सुरु झाल्याने तो सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे. यामुळे महापालिकेलाही आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. याकडे महापालिका आयुक्तांनीच लक्ष घालावे, अशी अपेक्षा सातपूरकर करत आहेत
"सध्या जुन्या जलतरण तलावावर दिवसभरात पुरुष व महिला अशा सात बॅच घेतल्या जातात. आता उन्हाळा सुरु झाल्याने समर कॅम्प घेतले जातात पण संख्या अधिक वाढल्याने महिलांचा जलतरण तलाव सुरू करावा." -आशा पाटील, जलतरणपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.