Womens Under 19 Cricket : ईश्वरी सावकारचे घणाघाती दीडशतक!; महाराष्ट्राचा विदर्भावर विजय

Ishwari Savkar
Ishwari Savkaresakal
Updated on

नाशिक : डेहराडून येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय क्रिकेट स्‍पर्धेत महाराष्ट्राने विदर्भ संघाचा पराभव केला आहे. १९ वर्षांखालील महिलांच्‍या महाराष्ट्र संघाकडून खेळताना नाशिकच्‍या ईश्‍वरी सावकार हिने या सामन्‍यात घणाघाती दीडशतक झळकावले. (Womens Under 19 Cricket Ishwari Savkar massive century Maharashtra win over Vidarbha Nashik sports news)

नाशिकच्या महिला क्रिकेटपटूने राष्ट्रीय पातळीवरील महिला स्पर्धेत कर्णधारपद भूषविताना थेट दीडशतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार ईश्वरीने १५५ चेंडूत २० चौकार, एक षटकार ठोकत १५१ धावा फटकावल्या.

यामुळे महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ५ बाद २७७ अशी धावसंख्या उभारली. ईश्वरीला के. एन. मुल्लाने नाबाद ५८ धावांची साथ दिली. उत्तरादाखल विदर्भाला ५० षटकांत ८ बाद १८५ इतकीच मजल मारता आल्‍याने महाराष्ट्राने ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात ९३ धावांनी मोठा विजय मिळवला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Ishwari Savkar
Nashik Health Camps : जिल्हयात आजपासून महाआरोग्य शिबिरे

नाशिकची अष्टपैलू शाल्मली क्षत्रियचीदेखील या महाराष्ट्र संघात असून तिने दोन षटकात ९ धावा दिल्या. डेहराडून येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत ईश्वरी सावकारने विजयी सुरवात केली. महाराष्ट्र संघाने अरुणाचल, पुंडूचेरी पाठोपाठ गोवा संघावर ९ गडी राखून जोरदार विजय मिळवला होता.

प्रथम फलंदाजी केलेल्या गोवाला ३६ षटकांत ६६ धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार ईश्वरी सावकारने नाबाद ३२ धावा करत महाराष्ट्र संघाला अकराव्या षटकातच ९ गडी राखून विजयी केले होते. तर शाल्मली क्षत्रियने ५ षटकांत १३ धावा दिल्या व एक गडी बाद केला. आता विदर्भ संघालाही पराभूत केले. ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात हा पाच सामन्यातील चौथा विजय आहे.

Ishwari Savkar
Nashik Rain News : शहरात सायंकाळी वरुणराजा बरसला!; दिवसभर उकाडा, सायंकाळनंतर वातावरणात गारवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.