नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात लावल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या कमांड कंट्रोल सेंटरच्या अर्थात इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या कामात अनियमितता झाल्याची तक्रार थेट विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून करण्यात आल्याने स्मार्टसिटी कंपनीचे काम गुंडाळण्यापूर्वीच वादात सापडले आहे.
कमांड कंट्रोल सेंटरसाठी ६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. परंतु काम देताना ३५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढालीची अट असताना १९ कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपनीला काम देण्यात आल्याची तक्रार आहे. (Work of Smartcity CCC Center in controversy Conspicuous in assembly Complaint of irregularity in work Nashik News)
नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी कंपनीची मुदत जून २०२४ मध्ये संपुष्टात येत असताना स्मार्टसिटी कंपनीमार्फत यापूर्वी केलेली कामे वादात सापडली आहे. स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात ८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत.
यातील ६५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये होणार आहे. त्यासाठी स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयात कमांड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
५ जुलै २०२२ ला देखभाल संदर्भातील ठेका देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेत पात्र कंपनीला ३५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल बंधनकारक होती, परंतु मेसर्स सेक्युटेक ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची वार्षिक उलाढाल १९ कोटी रुपयांपेक्षाही कमी असताना त्याच कंपनीला ठेका दिला गेला.
निविदा अंतिम करताना कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कागदपत्रे तपासली नाही. मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स साइटवरून तपासणी करणे गरजेचे असताना कसे काम स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून झाले नाही.
यासंदर्भात यापूर्वी पंतप्रधान कार्यालयासह राज्याचे नगर विकास विभागाचे सचिव भूषण गगराणी यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे.
सीएस प्रमाणपत्रात घोळ
संबंधित कंपनीने काम मिळविताना २१ जुलै २०२२ ला रामदास उबाळे यांच्या नावाने सीए प्रमाणपत्र घेतले व स्मार्टसिटी कंपनीकडे सादर केले. सादर प्रमाणपत्रावर सीएम क्रमांक १०६००३५ असा आहे.
परंतु यांच्या नावाने सीएस प्रमाणपत्र सादर करण्यात आले, त्यांचा मृत्यू १८ एप्रिल २०२० ला झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान शासन दरबारी चौकशी सुरू असतानाच आता विधानसभेत आमदार सरोज अहिरे यांनी लक्षवेधी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.