Nashik News : तालुक्यातील १३७ ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यासाठी महावितरणमार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे कामाला लवकरच सुरवात होणार आहे. या कामांसाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपये निधी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे. (Work order of 137 Rohitras in Sinnar taluka problem of electricity will solved soon Nashik News)
तालुक्यातील अनेक गावांमध्ये नवीन रोहित्र बसविणे, रोहित्राची क्षमता वाढविणे गरजेचे होते, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८९ लाख तर स्थानिक कृषी योजनेंतर्गत ४ कोटी ६१ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या कामांचे कार्यारंभ आदेश महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतेच दिले. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. पुढील गावांत कामे होणार आहेत.
आशापूर येथे भगवान पाटोळे यांच्या घराजवळ, बारागाव पिंप्री येथे कटके मळा, सुशील मेंगाळ व इतर, बेलू येथे सीताबाई व युवराज तुपे यांची वस्ती, भरतपूर येथे गावठाण भाग, चास येथे बादशहा खैरनार येथे २ ठिकाणी,
रामनाथ वाळीबा, टेकाडी, हनुमान मंदिर, मीना मेंगाळ, सोमनाथ पवार, दापूर येथे साईबाबा मंदिर, पोपट किसन, फुलाजी तुकाराम, नेहरवाडी, दातली येथे ३ रोहित्रे, देवपूर येथे नागीचा मळा, कोमडे, बापू गुरुजी, सात वस्ती,
जाधव वस्ती, दोडी येथे २ रोहित्रे, डुबेरे माळवाडा व डुबेरे वडगाव रोड, फर्दापूर येथे घुगे वस्ती, गोंदे येथे बंधारा व भरडी मळा, गुळवंच येथे १, जामगाव येथे गावठा, कासारवाडी जगताप मळा, खोपडी चकोर,
कोळगाव माळ येथे नाना गवळी व गाव, कोनांबे येथे दत्ता पगार, ग्रुप नंबर ५. पापळेवाडी, मानोरी चकणे, म्हसोबा, मेंढी येथे केदार मवाळ मिरगाव चौघुले, सिंगल फेज, मुसळगाव सोपान शिरसाठ व व इतर ३, नांदुरशिंगोटे डोंगरे २ ठिकाणी असतील.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
निमगाव देवपूर रामचंद्र जगताप, निमगाव सिन्नर पालवे डी पी, पंचाळे गीते मळा, १२ बिघे २, सुनील मोरे व आग्रीवस्ती, त्र्यंबक जगताप, पांगरी बु चंद्रकांत चिने, कुऱ्हाडे, पांगरी खु महानुभाव, बाळासाहेब पगार,
पाटोळे कातवण मळा, रामपूर एकनाथ घोटेकर, सरदवाडी, सावतामाळीनगर ढोकणे मळा, शिवडे गणेशा, सिन्नर बलक, उगले, गावठाण, भाटवाडी गावठा, सगर विद्याप्रसारक येथे भूमिगत वाहिनी करणे, सोनांबे येथे कचरू पाटील,
गुरुद्धारी ग्रुप २ व शिवाजी डगळे, सोनेवाडी येथे लक्ष्मण मेंगाळ यांच्यासह ३, ठाणगाव वरखडा, म्हाळुंगी, रामनाथ मधे, काळेवाडी, ठाकरवाडी आदिवासी वस्ती, वडांगळी संतू रुंजा, चानखान बाबा व १, वावी खाटेकर,
भाटवाडी पाचोरे व शिवराम भांगरे, एकलहरे चिंचेचा मळा २, हिवरे मच्छिंद्र सहाणे, रूपवते वस्ती, कणकोरी सुरेगाव रोड, शेअरवाडा, निऱ्हाळे लावण, दुसंगवाडी येथे ढमाले, शहा सिंगल फेज, पाथरे राजू घुमरे, गवळी मळा,
खळवाडी, उजणी पवार वस्ती, शिंदेवाडी कैलास हांडोरे, मीठसागरे डावरे मळा, सिंगल फेज, खंबाळे हिरामण भालेराव व १, विजयनगर १०० केव्ही, लोणारवाडी जामखर मळा,सायाळे चिंचोली रोड,कुंदेवाडी अनिल माळी,धोंडबार कवटे वस्ती,घाटकर वस्ती,
जाधव वस्ती,जायगाव गायरण वस्ती,देशवंडी घाटवस्ती ठाकरमळा,चंद्रपूर ठाकरवस्ती,फुलेनगर सूरज पवार,औंढेवाडी भीमा कुंदे, नायगांव गट नं.२५९, जोगलटेंभी ग्रामपंचायत,सांगवी गांव,
ब्राह्मणवाडे विठाबाई वाघ,प्रकाश रामराजे व आगासखिंड येथे किसन त्रिभुवन यांच्या वस्तीवर रोहित्र बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी काही गावांचे कार्यारंभ आदेश पुढील आठवड्यात निघणार आहे.
"सुरळीत वीजपुरवठयासाठी रोहित्रांसाठी संख्या व क्षमता वाढविणे गरजेचे असल्याने या कामासाठी शासनाकडून १० कोटींपेक्षा अधिक निधी मिळाला आहे. कामाचे कार्यरंभ आदेशही निघाले आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे."
-माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.