जुने नाशिक : आगामी महापालिका निवडणुका (NMC elections) आणि पावसाळ्यामुळे तयार करण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन कक्षात (Disaster Management Room) लावण्यात आलेली ड्यूटी (Duty), तसेच दैनंदिन कार्यालयीन कामामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने महापालिका प्रशासन कामांना लागले आहे. (work stress on NMC employees of NMC election Nashik News)
सहाही विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यात आली आहे. सध्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंदर्भातील मतदारांची नावे, दुबार नावे, मृत मतदार वगळणे अशा विविध प्रकारची कामे सुरू आहे. येत्या काही दिवसात प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी याद्या कामांना वेग आला आहे. त्याचबरोबर महिला आरक्षण सोडत घोषित झाल्यानंतर त्यावरील हरकती जमा करून त्या निकाली काढण्यासाठीचे आवश्यक काम सुरू आहे. अशातच पावसाची चाहूल लागल्याने सहाही विभागीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला आहे. नागरिकांना मदतीसाठी कक्ष असल्याने २४ तास सकाळी ६ ते २ दुपारी २ ते १० तसेच रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन टप्प्यात कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यालयीन कामे सांभाळून निवडणुकीचे कामे करावी लागत आहे. त्यानंतर पुन्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षेत ड्यूटी बजावली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. काही कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामातून वगळण्यात यावे. यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर काहींनी निवडणुकीची कामे असतील तर आपत्ती व्यवस्थापन कक्षेत नियुक्ती करू नये, अशी मागणी केली आहे. ३० मेपासून विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाला नसल्याने अद्याप कुठली तक्रार प्राप्त झाली नाही. परंतु आगामी दिवसांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना मदतीची आवश्यकता भासणार आहे. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येणार असल्याने कर्मचाऱ्यांवर अधिकच ताण पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.