Nashik : पाईप टाकण्याच्या कामाला मुहूर्त कधी?

Pipes laid by railway department Latest Marathi News
Pipes laid by railway department Latest Marathi Newsesakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : सबवेतून साचणारे पाणी काढून टाकण्याच्या कामाला रेल्वे यंत्रणेकडून अद्यापही मुहूर्त लागत नसल्याने गेल्या वर्षीची पुनरावृत्ती यंदा पुन्हा होणार का, अशी साशंकता उभी राहिली आहे.

रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग (Railway Engineering Department) व सार्वजनिक बांधकाम खात्याने (Public Works Department) एकत्रित सबवेच्या अडथळ्यांवर मार्ग काढावयाचा असल्याने पावसाळ्यात (Monsoon) पुन्हा वेगळ्या प्रकारची समस्या उदभवते का याविषयी नागरिकांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यातच लेंडी नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामाला पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर उभा राहिला तर पुढे काय, अशीही चर्चा नागरिक आता करू लागले आहेत. (Work to remove water from subway not done yet by railway department Nashik Latest Marathi news)

सध्या सगळीकडे दमदार पाऊस पडत असला तरी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या मुसळाधार पावसामुळे शहरात चहूकडे पुराचे पाणी घुसले व मध्यवर्ती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली होती. आरेखनातील तांत्रिक दोषामुळे रेल्वेने फाटकाऐवजी उपलब्ध करून दिलेला सबवे हा पर्याय वादग्रस्त ठरला आहे.

या सबवेमधून सध्या दुहेरी वाहतूक असल्याने वाहतूक कोंडी ची समस्या अधूनमधून उदभवत असते. त्यासाठी सबवेमधून मटण मार्केट पाडून दुसऱ्या मार्गाने ‘भोंगळे रस्ता व्हाया ढवळे बिल्डिंग’ असा पर्याय स्वीकारण्यात आला. आमदार सुहास कांदे यांनी नगरविकास विभागातून त्यासाठी जवळपास साडेआठ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

Pipes laid by railway department Latest Marathi News
OBC जातीनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे : छगन भुजबळ

गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली. पावसाचे पाणी शहरात जाऊ नये, यासाठी एक मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यातून एक हजार क्युबिक मीटर एवढा मलबा बाहेर काढण्यात आला.

सबवेपासून रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून दीड मीटर व्यासाचे जवळपास चाळीस मीटर अंतराएवढे पाईप टाकण्यात येणार आहे. रेल्वेने पाईप आणून ठेवले. मात्र, कामाला प्रत्यक्ष सुरवात अजूनही केलेली नाही. या कामाचा मुहूर्त कधी लागणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

सुदैवाने पावसाचे प्रमाण अद्यापही जेमतेम असल्याने वेगळी समस्या नाही. अगोदर नदीपात्रातील अतिक्रमणे व सबवेमुळे शहरात येणारे पाणी रेल्वेच्या न टाकलेल्या पाइपमुळे येऊ नये, अशी भाबडी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pipes laid by railway department Latest Marathi News
जरीफबाबा खून प्रकरण : वाहनचालकासह तिघांना मुंबईतून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.