Nashik Crime News : कामगारानेच फोडले Sagar Sweets! 22 लाखांची रोकड जप्त

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : गंगापूर रोडवरील सागर स्वीट्स‌ दुकानातील कार्यालय फोडून ३५ लाखांची रोकड चोरीला गेल्याच्या घरफोडीची उकल झाली आहे. या दुकानात काम करणाऱ्या कामगारानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले असून, गंगापूर व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांपैकी एकास अटक केली आहे. संशयिताकडून २२ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून, दुसऱ्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. (worker broke Sagar Sweets 22 lakh cash seized Nashik Crime News)

गेल्या १८ डिसेंबरला मध्यरात्री सागर स्वीट्स दुकानाच्या गॅलरीवाटे कार्यालयात शिरून घरफोडी केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल होता. या घरफोडीत १५ लाख रुपयांची चोरी झाल्याचे फिर्यादीत रतन चौधरी यांनी सांगितले. मात्र त्यांच्या भावाचीही २० लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चोरट्यांनी या घरफोडीत ३५ लाख रुपये चोरल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख, शहर गुन्हे शाखा युनिट एकचे विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुकानासह परिसरातील व रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही तपासले. दुकानातील आजी-माजी कामगारांचीही माहिती घेतली. त्यात दुकानातील काही आठवड्यांपूर्वी काम सोडून गेलेल्या विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वरप्रसाद याने दुसऱ्या साथीदारासह मिळून घरफोडी केल्याचे समेार आले.

त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, अंमलदार योगेश चव्हाण, रवींद्र बागूल, येवाजी महाले, संदीप भांड, विशाल देवरे आदींच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथून संशयित अखिलेशकुमार मनिराम (वय २५, रा. जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेत अटक केली. चौकशीत त्याने विवेककुमार याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अखिलेशकडून २२ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. त्यास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Crime News
Nashik Traffic News : रविवारी रात्री शहरातील वाहतुकीचा ‘चक्काजाम’!

दुसऱ्याने केली चलाखी

संशयित विवेककुमार याने घरफोडी करून उत्तर प्रदेशला गेला आणि स्वत:ला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणात सफदरगंज पोलिस ठाण्यात अटक करवून घेतली. जेणेकरून घरफोडीचा गुन्हा घडला त्या वेळी अटकेत असल्याचा चलाखीचा बनाव त्याने केला. मात्र त्याचा हा बनाव फसला असून, नाशिक पोलिस न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याचा सफदरगंज पोलिसांकडून ताबा घेणार आहे.

संशयित विवेककुमार याने मालकाचा विश्वास संपादन केल्याने त्यास दुकानातील कार्यालयात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती. अखिलेशकुमार सोबत मिळून त्याने घरफोडीचा कट रचला. काही आठवड्यांपूर्वीच त्याने काम सोडल्यानंतर तो पुन्हा नाशिकला आला व अखिलेशकुमारच्या मदतीने त्याने घरफोडी करून रोकड चोरली व दोघे गावी पसार झाले.

तांत्रिक तपास ठरला महत्त्वाचा

संशयित अखिलेशकुमार याने गॅलरीतून कार्यालयात शिरताना लॉक तोडण्यासाठी सुमारे दहा मिनिटे खर्ची घातले. त्यावरूनच चोरटा नवखा असल्याचे पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. त्याचप्रमाणे दुकानातील व रेल्वेस्थानकातील सीसीटीव्हीवरून संशयितांची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांचा यशस्वी माग काढला.

Crime News
Nashik News : शालेय पोषण आहाराचा वाद विधिमंडळात! तारांकित प्रश्नावर आज चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.