सातपूर (जि. नाशिक) : गोंदे येथील जिंदालमधील अग्नितांडवचा धूर कमी होत नाही तोच सिन्नरमधील जिंदाल पाइप कंपनीत तीन दिवसांपूर्वी मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
यामुळे कारखान्यात तपासणी करण्यासाठीचे इन्स्पेक्टरराज बंद केल्याने औद्योगिक सुरक्षाचे तीनतेरा वाजल्याचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. (Worker dies after getting stuck in Sinnar Jindal pipe company machine Nashik News)
दरम्यान, गेल्या आठवड्यात वर्षाच्या सुरवातीला गोंदे येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत अग्नितांडवची घटना समोर आली होती. यात दोन महिला व एक पुरुष कामगाराचा मृत्यू झाला होता, तर १७ कामगार जखमी झाले होते.
या घटनेतील अग्नी शमत नाही तोच सिन्नरमधील जिंदाल पाइप कंपनीत दुर्घटना झाली आहे. अर्थात, दोन्ही कंपन्यांत नाव जिंदाल असले तरी दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या मालकांच्या आहेत.
सिन्नरमधील जिंदाल पाइप कंपनीत ५ जानेवारी २०२३ ला कंपनीचे एम.डी. व त्यांची मुलगी कंपनीला भेट देण्यासाठी आले होते.
कंपनीत पाहणी करत असताना महेंद्र विठ्ठल वव्हाळे हा कामगार मशिनमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याचे सिन्नर एमआयडीसी पोलिस तपास यंत्रणेकडून सांगितले जाते. याबाबत औद्योगिक सुरक्षा विभाग व कामगार विभाग या घटनेबाबत तपास करीत आहेत.
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
कारखान्यातील निरीक्षण पूर्ववत सुरू करावे
मागील तीन ते चार वर्षांपासून विविध कामगार कायद्यांतर्गत कारखान्यातील निरीक्षणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कामगार आयुक्त, औद्योगिक सुरक्षा, अन्न व सुरक्षा, बाष्पके, एमपीसीबीसह विविध उद्योग व कामगार विभागातील अधिकाऱ्यांचे हात बांधले गेले असून, त्याचा फटका कामगारांना बसत आहे.
निरीक्षण बंद असल्यामुळे कामगार विभागाकडून कारखानदारांवर थेट अंकुश नसल्याने कारखानदारांकडून कामगार कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. कारखान्यातील निरीक्षण पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी विविध कामगार संघटनांसह अधिकारी व कर्मचारीवर्गाकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.