Nashik News : खोदकाम सुरू असताना तोल गेल्याने पाण्यात बुडून कामगारांचा मुत्यू

death
deathesakal
Updated on

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवपूर (ता .सिन्नर) येथील शेततळ्यात विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिर कामगारांचा पाय घसरून तोल गेल्याने पाण्यात बुडून मुत्यू झाला आहे. चार विहिर कामगारांचा मस्तीच्या नादात ही दुर्घटना घडली आहे.

आज शुक्रवारी ता.19 ला सुमारे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात मुतदेह वैद्यकीय तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. (Workers drowned in water due to loss of balance while digging Nashik News)

देवपुर निमगाव देवपूर शिवारात शेतकरी विनायक मुरलीधर गडाख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम काम सुरू आहे. खडांगळीचे माऊली शिंदे यांनी विहिर खोदकामांचा ठेका घेतला आहे.

आज शुक्रवारी शनि अमावास्येचा दिवस असल्याने विहिरीचे खोदकाम बंद होते. श्री. शिंदे यांनी नाशिक च्या पेठ नाक्यावरून विहिर खोदकामांसाठी मजूर आणले आहे. आज खोदकाम असल्याने नाशिकला जाऊन कामावर रिक्षाने आले.

सुट्टीचा दिवस असल्याने चार विहिर कामगार नशेत असल्याचे समजते. ह्या विहिरीच्या ठिकाणी हस्य मस्ती सुरू होती. त्यावेळी चार कामगार पैकी एक जण साधारण वय वर्षं पंचेचाळीस वर्षे तरूण विहिरीत डोकावला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death
Crime News: वादातून केला शिरच्छेद अन् अख्ख्या जिल्हयातील इंटरनेट गायब, जाणून घ्या काय आहे प्रकरण

त्यावेळी तोल जाऊन थेट विहिरीत पडला. विहिरीला पाणी असल्याने तो विहिरीत बुडला.उवर्रती तीन कामगारांनी खोदकाम मांडी सहाय्याने विहिरीत वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू खुप उशीरा झाला होता.

शेतकरी विनायक गडाख यांनी घटनेची माहिती ठेकेदार माऊली शिंदे यांना दिली. यावेळी स्थानिक व ठेकदार यांच्यात विहिर कामगार मुत्त्यू देह वर काढल्यावरुन किरकोळ वाद झाल्याचे समजते.सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या सांगण्यानुसार वैद्यकीय तपासणीला मुतदेह नेण्यात आला आहे.

पंचनामा झाला आहे.पण मयत कामगारांचे तीन सहकारी नशेत असल्याचे समजते.त्यामुळे पोलीसांना मयतांचे नाव कळू शकले नाही.विहिर ठेकेदार घ्या गाडीत तीन कामगार सह स्थानिक ग्रामस्थ आहे.

death
Crime News: वादातून केला शिरच्छेद अन् अख्ख्या जिल्हयातील इंटरनेट गायब, जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.