Nashik : ताइत मुलीचा फोटो लटकावून अघोरी विद्येचा प्रकार; अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची पोलखोल

Police and activists while taking possession of the material hanging from the tree in the sports complex.
Police and activists while taking possession of the material hanging from the tree in the sports complex.eskal
Updated on

Nashik News : येथील तालुका क्रीडासंकुलात लिंबाच्या झाडाला मुलीचे छायाचित्र, अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले साहित्य आढळून आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, संतापही व्यक्त होत आहे.

येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (workers of Superstition Eradication Committee found Material on tree nashik news)

शहरातील क्रीडासंकुलात हा प्रकार लक्षात येताच जागरूक नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले. त्यावरून कार्यकर्त्यांनी पाहणी करून अघोरी विद्येचा प्रकार असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव उदयकुमार कुऱ्हाडे व येवला शाखेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली.

त्यांनी तत्काळ हवालदार गेठे व गायकवाड यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. झाडाला लावलेला ताइत, मुलीचे छायचित्र, लटकवलेली चिठ्ठी ताब्यात घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान दाखवत रक्षाबंधनाच्या बहीण-भावाच्या पवित्र नात्याच्या दिवशी समाजात कोणतीही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली.

हे कृत्य कोणत्या व्यक्तीने केले हे निश्चित नसल्याने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police and activists while taking possession of the material hanging from the tree in the sports complex.
NMC Commissioner : नेमका वास्तुदोष की दुरुस्ती? महापालिका आयुक्त यांच्या बंगल्यावरून विविध चर्चा

मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या अर्जाच्या आधारे तपास करून या कृत्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे आश्वासन दिले.

अशा प्रकाराने फक्त अंधश्रद्धा पसरते, सामाजिक तेढ निर्माण होते. याव्यतिरिक्त कोणतेही लाभ होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा कृत्याला बळी पडू नये, अथवा भविष्यात असे कृत्य करू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव उदयकुमार कुऱ्हाडे, आयुब शहा, आजिनाथ आंधळे, भीमसेन कोपनर, प्रशांत शिंदे उपस्थित होते.

"एखाद्याच्या फोटोचा वापर करून ताइत व वशीकरण मंत्राच्या आधारे व्यक्तीला वश करता येते. आपल्या इच्छेप्रमाणे वागवता येते, अशी मोठी अंधश्रद्धा समाजात आहे. मात्र, अशाप्रकारे वश करता येत नसून हा केवळ अंधश्रद्धेचा प्रकार आहे. हा प्रकार जादूटोणाविरोधी कायदा २०१३ अंतर्गत अघोरी विद्येचा प्रकार म्हणून अजामीनपात्र गुन्हा ठरतो." -उदयकुमार कुऱ्हाडे, जिल्हा सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Police and activists while taking possession of the material hanging from the tree in the sports complex.
Nashik Doctor Bharti : डॉक्टरांच्या भरतीसंदर्भात पेच; शासनाकडून मागविले मार्गदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.