Nashik News : येथील नवीन बसस्थानकाजवळील बहुचर्चित उड्डाणपुलाचे राहिलेले काम पुन्हा सुरु झाले आहे. उड्डाणपुलाचे काम दर्जेदार होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दिवसरात्र झपाट्याने सुरु असलेल्या कामावर शेकडो कामगार काम करीत आहेत. (Working at risk of life to work of flyover in malegaon nashik news )
मात्र हे कामगार काम करत असताना त्यांच्याकडे सुरक्षिततेची कुठलीच साधने नसल्याने दिसून आले आहे. त्यामुळे काम करताना अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. औद्यागिक, बांधकाम क्षेत्रात काम करताना अनेकदा कर्मचाऱ्यांचा कामावर उंचीवरून तोल जाऊन पडल्याने, शॉक लागून, आगीत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे.
यासाठी औद्यागिक सुरक्षा विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवीन कायदे करण्यात आले आहे. यात कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कामगारांमध्ये नियमांबाबत विभागातर्फे जनजागृती देखील करण्यात येत आहे. मात्र असे असताना देखील अनेकदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा कुठलाच विचार होत नसल्यानेच वेळोवेळी घटनांमधून अधोरेखित झाले आहे.
शहरात बहुचर्चित उड्डाणपुलाचे राहिलेले काम पुन्हा जोरात सुरु झाले आहे. यासाठी दिवस-रात्र कामगार काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहे. सध्या पुलावर गज टाकण्याचे काम करण्यात येत आहे. येथे अनेक कामगार काम करीत आहेत. या कामगारांना काम करताना डोक्यात हेल्मेट राहत नाही.
कामगार काम करताना अत्यंत छोट्या जागेवर बसून काम करतात. त्याच जागेवर ते साईडला लोखंडी फळ्या लावायचे काम करीत आहेत. नवीन बसस्थानकाजवळ दोन्ही बाजूंना वाहनांची वर्दळ असते. वर्दळीचे व शहराच्या मध्यभागी असलेल्या या ठिकाणी नेहमी गजबज असते.
पुलाचे काम सुरु असलेल्या दोन्ही बाजूंना सातत्याने वाहतूक सुरु असते. त्यामुळे कामगारांना काम करताना खूपच दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगार व त्यांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.