Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग तीनमधील काम वाटपाबाबत ठेकेदारांनी तक्रारी केल्या असतानाच बांधकाम एक विभागाकडूनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निधीतील कामांचे दोन वर्षानंतर वाटप केले.
हे वाटपही थेट ग्रामपंचायतीना देण्याचा विक्रम बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. यामुळे ठेकेदारांनी बांधकाम विभागात येत, विचारणा केली. यावरून काही काळ वादंग झाले. (Works given to Gram Panchayat without demand zp Administration of Construction Department Nashik ZP News)
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी २०२०-२१ मध्ये खासदार निधीतून पेठ तालुक्यात पाच कामे मंजूर केली. साधारणः दहा ते वीस लाखांची ही कामे असून यात काँक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, सुशोभीकरण करणे या कामांचा समावेश आहे.
या कामांचे वेळेत वाटप करणे अपेक्षित होते. याबाबत अनेकदा पत्र देऊन देखील कामांचे वाटप बांधकाम विभागाने केले नाही. अनेकदा पाठपुरावा करून अखेर या कामांचे वाटप झाले. यात बांधकाम विभागातील संबंधित कर्मचाऱ्याने ही कामे थेट ग्रामपंचायतींना दिली.
वास्तविक, खासदार निधीतील कामे ही ग्रामपंचायतीस देणे बंधनकारक नाही, यातही संबंधित ग्रामपंचायतींनी कामांची मागणी देखील केलेली नसताना कामे ग्रामपंचायतीस देण्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कामे ग्रामपंचायतीला दिल्यानंतर, संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागात येऊन विचारणा केली. त्यावेळी संतप्त झालेल्या ठेकेदार अन कर्मचारी यांच्यात तू-तू-मैं-मैं झाली. कार्यालयात सुरू झालेला हा वाद अगदी कार्यालयाबाहेर आला.
संबंधित ठेकेदारांनी आरडाओरड करत कर्मचाऱ्यांवर आरोप केले. अखेर कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी यात मध्यस्थी करत, याबाबत चौकशी करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.
"खासदार निधीतील पाच कामे असून, ती ग्रामपंचायतीला देण्यात आली आहेत, कामांची मागणी केलेल्या ठेकेदारास कामे देणे आवश्यक होते. याबाबत चौकशी करून, दोषींवर कारवाई केली जाईल." - संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.