Jalyukta Shivar Abhiyan: टंचाईग्रस्त 45 गावांत ‘जलयुक्त’ची कामे; जलसंधारण विभागाला 9.46 कोटींचा निधी प्राप्त

Works will be done on priority basis under phase number two of Jalyukt Shivar Abhiyan in 45 villages affected by scarcity nashik news
Works will be done on priority basis under phase number two of Jalyukt Shivar Abhiyan in 45 villages affected by scarcity nashik news
Updated on

Jalyukta Shivar Abhiyan: जिल्ह्यातील जी गावे टंचाईग्रस्त आहेत आणि वर्षोनुवर्षे त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशा गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत प्राधान्याने कामे होणार आहेत.

त्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे ९.४६ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, यातून प्रामुख्याने सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती व नवीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात येणार आहेत. (Works will done on priority under phase two of Jalyukt Shivar Abhiyan in 45 villages affected by scarcity nashik news)

राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची सहा लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण केली आहेत. या योजनेतून २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात आल्या. शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा जलयुक्त शिवार अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांचा जलआराखडा तयार करून त्यानुसार गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत.

Works will be done on priority basis under phase number two of Jalyukt Shivar Abhiyan in 45 villages affected by scarcity nashik news
Jalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतील शिवार होणार जलयुक्त; दुसऱ्या टप्यातील कामांना मिळाली गती

जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून ही कामे होणार आहेत. त्यासाठी १५ तालुक्यांतील ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. ‘जलयुक्त’च्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, डिसेंबरअखेर या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. सूर्यवंशी यांनी दिली.

तालुकानिहाय गावे आणि निधी

नांदगाव- ४ गावे (एक कोटी १३ लाख), मालेगाव- सहा गावे (एक कोटी ५६ लाख), येवला- सात गावे (एक कोटी तीन लाख), इगतपुरी- तीन गावे (५९ लाख ९० हजार), त्र्यंबकेश्वर- एक गाव (३९ लाख ९६ हजार). दिंडोरी- चार गावे (६५ लाख ६७ हजार), पेठ- दोन गावे (२५ लाख ११ हजार), निफाड- तीन गावे (५४ लाख ८० हजार), बागलाण- तीन गावे (८७ लाख ९८ हजार), सुरगाणा- दोन गावे (७७ लाख ९६ हजार), कळवण- एक गाव (पाच लाख), चांदवड- चार गावे (४३ लाख ९० हजार), नाशिक- दोन गावे (३० लाख १३ हजार), सिन्नर- दोन गावे (४१ लाख ९८ हजार), देवळा- एक गाव (३९ लाख ८९ हजार)

Works will be done on priority basis under phase number two of Jalyukt Shivar Abhiyan in 45 villages affected by scarcity nashik news
Jalyukta Shivar Abhiyan: ‘जलयुक्त शिवार’चा 204 कोटींचा आराखडा! निधी उभारण्याचा प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.