Nashik News: 2 कोटी 56 लाखांची कामे येवला मतदारसंघात मंजूर

fund
fundsakal
Updated on

येवला : जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जनसुविधांची २ कोटी ५६ लाखांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मिळाला आहे. (Works worth 2 crore 56 lakh approved in Yeola constituency Nashik News)

यात ग्रामपंचायत इमारत, गावांतर्गत कॉंक्रिट रस्ते, सौर पथदीप, स्मशानभूमी शेड व घाट, दशक्रिया विधी शेड यासह अनुषंगिक कामांचा समावेश आहे.

देवरगाव येथे दशक्रिया विधी घाट, अंगणगावला सौर पथदीप बसविणे, एरंडगाव खुर्द येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे, सावरगाव (मोठामळा) येथे दशक्रिया विधी शेड, सोमठाण जोश स्मशानभूमी शेड, आडगाव रेपाळ येथे स्मशानभूमी घाट, सत्यगाव येथे दशक्रिया विधी शेड करण्यासाठी प्रत्येकी १० लाख, मुखेड येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी २० लाख,

चिचोंडी बुद्रुक येथे स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत, चांदगाव येथे स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत, नायगव्हाण व नांदूर येथे दशक्रिया विधी शेड करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख, तर ग्रामपंचायत आहेरवाडी अंतर्गत लहवित येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्यासाठी ७ लाख, असा एकूण १ कोटी ५७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

fund
Nashik News: अंबड एमआयडीसी ESIC रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा नाकारला

निफाड तालुक्यातील वनसगाव, टाकळी विंचूर येथे दशक्रिया विधी शेड व अनुषंगिक करण्यासाठी, मानोरी खुर्द येथे नवीन स्मशानभूमी बांधकामासाठी प्रत्येकी १५ लाख, नांदगाव येथे स्मशानभूमीत सुविधा करण्यासाठी,

दिंडोरी तास येथे स्टोर वस्ती स्मशानभूमीत सुविधा करण्यासाठी प्रत्येकी १० लाख, दिंडोरी तास, शिरवाडे वाकद येथे स्मशानभूमीत अनुषंगिक कामे करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख, विंचूर येथे दशक्रिया विधी परिसर कॉंक्रिटीकरण करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी २० लाख, असा एकूण ९९ लाख रुपयांचा मंजूर झाला आहे.

fund
Nashik News: LTT - मुझफ्फरपूर विशेष ट्रेन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.