World AIDS Day : इंटिग्रेस स्ट्रँड ट्रान्स्फर इनहिबिटर एचआयव्ही व्यवस्थापनात प्रभावी; विविध तज्ज्ञांचा विश्‍वास

World AIDS Day
World AIDS Day esakal
Updated on

World AIDS Day : ‘एचआयव्ही’च्या रुग्णसंख्येत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर असून, २.४ दशलक्ष रुग्ण ‘एचआयव्ही’ग्रस्त आहेत.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO)च्या २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतात अंदाजे ६२ हजार नागरिकांना एचआयव्हीचा संसर्ग होतो आणि २०२१ मध्ये एड्सने ४१ हजार रुग्णांनी जीव गमावला आहे. (World AIDS Day Integration strand transfer inhibitors effective in HIV management nashik news)

एचआयव्ही’सारख्या रोगावर मात करणे हे आजही वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आव्हान ठरत आहे. सर्व शहरातील तज्ज्ञांचा ठाम विश्वास आहे, की डॉल्युटेग्रावीर असलेली नवीन प्रगत इंटिग्रेस स्ट्रँड ट्रान्स्फर इनहिबिटर (INSTI )आधारित औषधं ‘एचआयव्ही’ उपचारांमध्ये आशादायक परिणाम दर्शवत आहेत.

डॉल्युटेग्रावीर हे इंटिग्रेस स्ट्रँड ट्रान्स्फर इनहिबिटर नावाच्या औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे, जे ‘एचआयव्ही’वरील उपचारात फायदेशीर ठरत आहेत. इंटिग्रेस स्ट्रँड ट्रान्स्फर इनहिबिटर हे शरीरातील ‘एचआयव्ही’ विषाणूची वाढ रोखण्यात मदत करतात. शिवाय, त्यांचे साइड इफेक्ट जास्त नसल्याने त्यांची शिफारस केली जाते.

World AIDS Day
World AIDS Day 2023 : बाई आणि डिंपलताईंनी HIV बाधितांच्या आयुष्यात फुलवलीय 'पालवी'

सध्याच्या उपचारांबद्दल बोलताना, नाशिक शहरातील प्रसिद्ध फिजिशियन डॉ. यतींद्र दुबे म्हणाले, की नवीन उपचार पर्याय रुग्णांना सोयीस्कर दैनंदिन पथ्यांसह उपचार सुरू ठेवण्यास मदत करतात आणि सुधारित परिणामांमध्ये मदत करतात. तज्ज्ञांना असा विश्वास आहे, की रुग्णांसाठी कमी दुष्परिणाम आणि कमी औषधांचे सेवन कराव्या लागणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरल एजंट्सची वाढती गरज आहे.

तसेच, या औषधांची किंमत कमी होणेही तितकेच आवश्यक आहे.
प्रख्यात विषाणुतज्ज्ञ व ‘एचआयव्ही’तज्ज्ञ डॉ. भूषण सुरजुसे सांगतात, की भारतात ‘एचआयव्ही’ नियंत्रण डॉल्युटेग्रावीरसारख्या नवीन प्रगत उपचारांसाठी पुढील संशोधन आणि सुधारित उपचार पद्धतींची भारतात गरज आहे. ‘एचआयव्ही’सारख्या जीवघेण्या आजाराला रोखण्यासाठी नवीन उपचार पद्धती तसेच औषधांचा वापर करणे तसेच त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

World AIDS Day
World AIDS Day 2023 : जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.