World Blood Donor Day 2023 : रक्तदानाच्या यज्ञात अवलियाची विक्रमी कामगिरी!

Gajanan Devachke receiving the certificate of Maharashtra Book of Records from the then Collector Suraj Mandre
Gajanan Devachke receiving the certificate of Maharashtra Book of Records from the then Collector Suraj Mandre esakal
Updated on

World Blood Donor Day 2023 : शासकीय नोकरी सांभाळून या रक्तदानाच्या यज्ञात स्वतःला वाहून घेत एका अवलियाने समाजासमोर आगळा आदर्श उभा केला आहे.

गजानन माधव देवचके, असे या अवलियाचे नाव असून, सध्या ते जिल्ह्यातील सिन्नर येथे उपकोशागार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (World Blood Donor Day 2023 Gajanan Madhav Deochake Deputy Treasury Officer donated blood 105 times nashik news)

त्यांनी आजवर एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल १०५ वेळा रक्तदान करून आगळा विक्रम आपल्या नावे नोंदविला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक पदापासून वर्ग-२ राजपत्रित अधिकारी या पदापर्यंतचा पल्ला गाठून त्यांनी आजपर्यंत २३ वर्षांची शासकीय सेवा पूर्ण केली आहे, तर शासकीय सेवा बजावत २० वर्षांपासून त्यांनी रक्तदानाच्या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले आहे.

त्यांनी नाशिकमधील जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून आजपर्यंत १०५ वेळा रक्तदान केले असून, यामध्ये ४२ वेळा सिंगल डोनर प्लेटलेट, एकदा कोविड प्लाझ्मा व ५९ वेळा होल ब्लड यांचा समावेश आहे.

सध्या ते राज्य शासनाच्या वित्त विभागामध्ये सिन्नर येथे उपकोशागार अधिकारी म्हणून कार्यरत असून, जनकल्याण रक्तपेढीच्या प्रकल्प समितीमध्ये संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gajanan Devachke receiving the certificate of Maharashtra Book of Records from the then Collector Suraj Mandre
World Blood Donor Day : रक्तदान चळवळीतील रक्तदाता ही तितकाच महत्वाचा...

वडील निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी (कै.) माधव रंगनाथ देवचके आणि पेठे हायस्कूलमध्ये उपमुख्याध्यापिका पदावर निवृत्त झालेल्या मातोश्री (कै.) हिराताई माधव देवचके यांच्यामुळे गजानन यांना शिक्षणाने येणारी सुजाणता आणि प्रशासकीय सेवेमुळे येणारी सामाजिक बांधिलकी याचे बाळकडू घरातूनच मिळाले.

अवघे कुटुंब रंगलंय...

रक्तदानाच्या या महान कार्यात त्यांनी त्यांचा मित्रपरिवार, कार्यालयातील सहकारी, तसेच नातेवाइकांसह पत्नी व मुली यांनादेखील प्रवृत्त केले आहे. त्यांची अर्धांगिनी अश्विनी देवचके यांनीही १४ वेळा रक्तदान केले आहे.

त्या नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २१ वर्षीय कन्या अनुष्का हिनेही चार वेळा रक्तदान पूर्ण केले असून, १७ वर्षीय धाकटी कन्या अक्षता हीदेखील रक्तदानासाठी १८ वर्षे पूर्ततेची आतुरतेने वाट पाहत आहे.

Gajanan Devachke receiving the certificate of Maharashtra Book of Records from the then Collector Suraj Mandre
World Blood Donor Day - रक्तगटांचा शोध लावणारे डॉ. कार्ल लँडस्टीनर

राष्ट्रीय विक्रमाची नोंद

गजानन देवचके यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेने घेतली आहे. यामध्ये ‘राज्य शासनाच्या सेवेतील १०० वेळा रक्तदान करणारा गट ‘ब’ संवर्गातील एकमेव राजपत्रित अधिकारी म्हणून राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला आहे. या विक्रमाचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

"रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान करणेविषयीचे गैरसमज दूर होऊन त्याबाबत आवड व गोडी निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रबोधनातून युवा पिढीला रक्तदानाकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा कमी होऊन राज्यातील गरजू बांधवांपर्यंत निर्भेळ व उत्तम रक्त मर्यादित वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करता येईल." - गजानन देवचके, उपकोशागार अधिकारी, वित्त विभाग, सिन्नर

Gajanan Devachke receiving the certificate of Maharashtra Book of Records from the then Collector Suraj Mandre
World Blood Donor Day : जागतिक रक्तदाता दिन 14 जूनलाच का साजरा करतात? जाणून घ्या रंजक कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.