World Breastfeeding Week 2022 : पुरेसे स्तनपान मिळणारी बालके बुद्धिवान

World Breastfeeding Week 2022 Latest Marathi News
World Breastfeeding Week 2022 Latest Marathi Newsesakal
Updated on

नाशिक : जन्मानंतर आईद्वारा बाळाला लगेच सुरू केले जाणारे स्तनपान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्यक्षात जन्माला येणाऱ्या दर तीन मुलांपैकी केवळ एका मुलाला पुरेशा काळासाठी स्तनपानाचा लाभ मिळतो.

जागतिक आरोग्य संघटनेने नवजात बालकांना पहिले किमान सहा महिने फक्त आणि फक्त आईचे दूध पाजण्यात यावे असे सांगितले आहे. (World Breastfeeding Week 2022 Babies who are adequately breastfed are intelligent Nashik Latest Marathi News)

आईचे दूध हा बाळांना मिळणाऱ्या सर्वात आदर्श आहारांपैकी एक आहे. आईचे दूध सुरक्षित व स्वच्छ असतेच, शिवाय बाळाचे अनेक आजार दूर करू शकणाऱ्या प्रतिजैविकांनी युक्त असते. बाळाच्या सहा महिन्यांमधील वाढीस पूर्णपणे उपयुक्त अशी ऊर्जा आणि पोषणमूल्ये आईच्या दुधातून मिळू शकतात.

सहा महिने ते एक वर्ष या काळात हेच प्रमाण ५० टक्के, तर एक वर्ष ते दोन वर्ष या काळात एक तृतीयांश घटक हे स्तनपानातून मिळतात. त्यामुळे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला पूरक आहार सुरू करणे महत्त्वाचे असते.

World Breastfeeding Week 2022 Latest Marathi News
Dhule : राजाराम महाराजांची १२५ वी जयंती साजरी

तर एक वर्षानंतर बाळाला, एरवी प्रौढ माणसे खातील खातात, असा सर्व आहार योग्य प्रमाणात सुरू करणे उत्तम असते. पुरेसे स्तनपान मिळणारी बालके पुढे बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये अधिक चांगला परफॉर्मन्स देतात असे आढळून आले आहे.

लहानपणी पुरेसे स्तनपान आणि पोषक आहार न मिळाल्याने दरवर्षी सुमारे साडेआठ लाख मुले मृत्युमुखी पडतात. योग्‍य काळजी घेतली तर हे सहजपणे टाळता येण्यासारखे आहे. योग्य स्तनपानाद्वारा लहान मुलांचे आरोग्य सांभाळल्यास भविष्यात आरोग्य व्यवस्थेवर होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.

"पूर्वी एचआयव्ही बाधित मातांनी बाळांना दूध पाजू नये, अशा सूचना होत्या. पण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अशी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सुरू असेल तर असे बाळ बारा महिन्यांपर्यंत स्तनपानाचा लाभ घेऊ शकते."

- प्रतिभा औंधकर, वैद्यकीय अधिकारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी

World Breastfeeding Week 2022 Latest Marathi News
नव्या सरकारकडून धुळे विकासाला गती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()