World Cup 2023: नाशिककर घेणार क्रिकेटचा ‘आखो देखा’ आनंद; फायनल साठी नाशिकहून अहमदाबाद सेवा फुल

Ind vs Aus World Cup Final 2023
Ind vs Aus World Cup Final 2023
Updated on

World Cup 2023: ओझर विमानतळाहून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अहमदाबाद सेवेमुळे नाशिककर थेट नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये बसून अंतिम सामन्याचा आनंद लुटणार आहे.

आतापर्यंत जवळपास शंभरहून नाशिककरांनी विमानासह स्टेडिअमचे बुकिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (World Cup 2023 Nashik to Ahmedabad service full for finals news)

विश्वकरंडक क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी (ता. १९) अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये होणार आहे. जवळपास लाखभर प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडिअममध्ये नाशिककरांना देखील अंतिम सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. संधी मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे, अहमदाबादमध्ये पोचण्यासाठी सुरू झालेली विमानसेवा.

नाशिकच्या ओझर विमानतळावरून अहमदाबादसाठी सकाळी अकराला व रात्री ९.२५ ला ७८ आसनव्यवस्थेची विमानसेवा सुरू झाली आहे.

Ind vs Aus World Cup Final 2023
World Cup 2023 : गुरु द्रविडचा विश्वास ठरवला खरा, राहुलचे यश टीम इंडियाचा टर्निंग पॉइंट

अवघ्या दीड तासात अहमदाबादला पोचता येते. त्यामुळे मॅच बघण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एक दिवस मुक्काम करून जलदगतीने नाशिकला पोचता येणे शक्य आहे.

त्याशिवाय रस्तेमार्गाने देखील पहाटेपर्यंत नाशिकला पोचणे शक्य असल्याने त्याचा फायदा घेत अंतिम सामना बघण्यासाठी नाशिककरांकडून अहमदाबादला कूच केले जाणार आहे. भारत-पाकिस्तान साखळी सामन्यावेळी देखील जवळपास पन्नास नाशिककर विमानाने मॅच पाहण्यासाठी कूच करणार आहेत. दरम्यान, अंतिम सामन्यासाठी शहरातील हॉटेलमध्ये देखील मोठी स्क्रीन लावून ग्राहकांना मॅच पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Ind vs Aus World Cup Final 2023
World Cup 2023: "भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी कपड्यांशिवाय..." अभिनेत्रीने फायनलपूर्वी केली विचित्र घोषणा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.