जागतिक पर्यावरण दिन : नाशिकमध्ये मुरमाड जागेवर बहरली वनराई!

World Environment day
World Environment day esakal
Updated on
Summary

वातावरण बदलांचा पर्यावरणाशी थेट संबंध असल्‍याने सभोवतालची पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रत्‍येकाची जबाबदारी आहे. असेच समाजभान राखत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पर्यावरण संवर्धनाच्‍या कार्यात मोठे योगदान देत आहे.

नाशिक : वातावरण बदलांचा पर्यावरणाशी थेट संबंध असल्‍याने सभोवतालची पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रत्‍येकाची जबाबदारी आहे. असेच समाजभान राखत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पर्यावरण संवर्धनाच्‍या कार्यात मोठे योगदान देत आहे. २०१३ मध्ये विल्‍होळी परिसरातील वन विभागाच्‍या जागेत जलशुद्धीकरण केंद्राच्‍या मागे संस्‍थेच्‍या स्‍वयंसेवकांतर्फे वृक्षलागवड केली गेली.

(World Environment day 2021)

श्रमदानातून निस्वार्थ सेवा

जेथे गवतही उगवत नाही, अशा सात हेक्‍टरच्‍या मुरमाड जागेत सुरवातीस अठराशे रोपे लावली होती. त्‍यात वाढ करताना आता रोपांची संख्या सहा हजारांवर पोचली आहे. स्‍वयंसेवकांकडून केवळ रोपांची लागवड करून न थांबता दर आठवड्याला रोपांना पाणी देत श्रमसेवादेखील दिली जात आहे.

सामाजिक कार्यात प्रतिष्ठान अग्रेसर

उपजाऊ क्षेत्राच्या ऱ्हासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असते. याचा प्रामुख्याने आघात होतो, तो पर्यावरणावर. वाढत्या औद्योगिकीरणामुळे कंपन्यांतून, वाहनांतून होणारे घातक वायू उत्सर्जन त्यात वृक्षसंख्या घटल्याने ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे संपूर्ण निसर्गचक्रच बदलते. सुरवातीला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने कार्याची सुरवात केली, त्या वेळी त्याजागी पोचण्यासाठी रस्तादेखील नव्हता. श्रमदानातून सर्वप्रथम तेथे रस्ता बनविण्यात आला. पाण्याच्या ड्रमद्वारे वृक्षांना पाणी दिले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी अगदी लहान बाळाप्रमाणे वृक्ष संगोपन केले. त्यामुळे ही वनराई बहरली. विशेष म्हणजे इथे कृष्णा वड, रिठा, धायटी, धामण, असींद, मोहा, लक्ष्मितरू, बिबवा, कहांडोळी, आवळा, हिरडा, बेहडा सारखी दुर्मिळ आणि औषधी वनस्पती छान बहरली आहेत. यासोबत संस्थेमार्फत शहरात स्वच्छता अभियान, पाणपोई, रक्तदान, गरजूंना मदत, जलसंवर्धनांतर्गत ३५० बोरचे वॉटर हॉरवेंस्टिंगदेखील शहरात केले आहे.

''वृक्षलागवड, संवर्धन हा प्रतिष्ठानचा मुख्य उपक्रम आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रजातींच्या तसेच दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्याकडे प्रतिष्ठानचा कटाक्ष आहे. वयोवृद्ध, तरुण सर्वच वयोगटातील मंडळी अंतःकरणातून कार्यात स्वतःला झोकून देतात. वृक्षांना पाणी देण्याचे काम ड्रीपद्वारेही करता आले असते; पण एकत्र येऊन प्रत्यक्ष काम केल्याने जो जिव्हाळा निर्माण होतो, तो यामुळे आला नसता.''
-श्रीकांत शेळके, सदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान

World Environment day 2021

World Environment day
‘माझी वसुंधरा’ अभियान : नाशिक महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी!
World Environment day
गोदा प्रदूषणमुक्तीच्या नावाने होऊ द्या खर्च..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.