World High Blood Pressure Day : रक्तदाब नियंत्रणात ‘कलिंगड’ गुणकारी! फळातील Amino Acidने लाभ

watermelon
watermelon esakal
Updated on

World High Blood Pressure Day : संपूर्ण उन्हाळ्यात उपलब्ध असणारे कलिंगड किंवा टरबूज हे रक्तदाब नियंत्रणासाठी काकणभर जास्त उपयोगी असल्याचा अभ्यास नुकताच समोर आला आहे.

विशेष म्हणजे अधिक पाणी, कमी उष्मांक व ‘अमायनो अॅसिड’ लक्षणीय प्रमाणात असलेल्या कलिंगडाचे सेवन हे मधुमेहींसह सर्वांनीच केले पाहिजे, असे सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आशुतोष साहू यांनी दिली. (World High Blood Pressure Day watermelon effective in blood pressure control Benefits of Amino Acids in Fruits nashik news)

यंदा कलिंगडाचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने त्याची किंमत तुलनेने कमी आहेच;शिवाय त्याचे शरीराच्या दृष्टीने होणारे लाभदेखील जास्त असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासात हि बाब समोर आली आहे.

अमेरिकेच्या पाक्षिकातही हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात मुळात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना कलिंगड खाण्यास देण्यात आले आणि त्यामुळे त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाल्याचे १२ आठवड्यांच्या शास्त्रीय अभ्यासात समोर आले आहे.

डॉ. साहू म्हणाले की, प्रत्येक फळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्याचे चांगले लाभ आपल्या शरीरावर होत असतात. तसेच कलिंगडामध्ये ‘अमायनो अॅसिड’ असते आणि त्यामुळे उच्च रक्तदाब काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होते.

हृदयरोगासाठी कलिंगड उपयुक्त ठरते. मुख्य म्हणजे कलिंगडामध्ये ९१ टक्के पाणी असते आणि पुन्हा त्यात कमी म्हणजे केवळ १२७ उष्मांक असल्याने त्याचे सेवन सर्वजण करू शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

watermelon
Blood Pressure Control : या मशिनच्या साहाय्याने घरच्या घरी मोजा ब्लड प्रेशर, आजच ऑर्डर करा

मीठ कमी, अधिक फळे खावीत

मिठात सोडियम असते, तर फळांमध्ये पोटॅशियम असते आणि दोन्हींचे संतुलन शरीरासाठी गरजेचे आहे. त्यामुळे कमीत कमी म्हणजे तीन ते पाच ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात मीठ नको, याची पक्की खूणगाठ बांधून घेत, अधिकाधिक मोसमी फळांचे सेवन करणे नेहमीच हिताचे ठरते.

केवळ टरबूज नव्हे तर सगळीच मोसमी फळे वेगवेगळ्या गुणधर्मांनी परिपूर्ण असतात आणि त्यांचे सेवन त्या त्या मोसमात नक्कीच लाभदायी असते.

फळांमधील सुक्रोज नक्कीच गुणकारी असते आणि फळांच्या ज्यूसपेक्षा फळे त्यांच्या मूळ स्वरूपात कापून खाणे कधीही उत्तम असते. असेही डॉ. साहू यांनी सांगितले.

watermelon
High Blood Pressure ची समस्या आहे? तर या भाज्यांचं सेवन ठरू शकतं फायदेशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.