World Photography Day 2023 : निसर्ग कॅमेराबद्ध करीत वेगळेपण जपणाऱ्या ‘त्या’ चौघी! घर-नोकरी सांभाळत जोपासली आस्था

photography day
photography dayesakal
Updated on

World Photography Day 2023 : नाशिकमधील चार महिलांनी घर, नोकरी सांभाळून नाशिकचा निसर्ग कॅमेराबद्ध केला आहे. निसर्ग संवर्धनाची आस्था त्यांनी जोपासली आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त त्यांच्या प्रवासावर टाकलेला प्रकाशझोत.

आर्ट थेरपिस्ट सोनाली जोशी, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सीमा पाटील, शिक्षिका संजना काजवे, गृहिणी सीमा तंडगपल्लीवार यांनी कॅमेऱ्यातून नाशिकचा निसर्ग टिपून वेगळेपण जपले आहे. (world photography day 2023 women who do photography for hobby nashik news)

आर्ट थेरपिस्ट सोनाली जोशी पंधरा वर्षांपासून कला आणि मानसिक स्वाथ्य विषयावर काम करतात. त्यांनी सहज, गंमत म्हणून टिपलेल्या छायाचित्रांचे या क्षेत्रातील ज्येष्ठांकडून कौतुक झाले. गंमतीतून सुरु झालेला प्रवास पुढे आयुष्याचा तारणहार होईल याची कल्पना नसल्याचे त्या सांगतात. २०१३ मध्ये त्यांच्या छायाचित्रांचे ‘मनलहरी' हे पहिले प्रदर्शन कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झाले.

त्यानंतर त्यांना टांझानियाला जावे लागले. त्या वेळी वन्यजीव छायाचित्रण जवळून करता आले. २०१४ मध्ये कर्करोगाचा ‘रिपोर्ट' हातात पडला आणि परत उपचारासाठी देशात त्यांना यावे लागले. त्या वेळी जगण्याची उमेद कॅमेरा देत होता, असा सोनाली सांगत होत्या.

पुढे टांझानियामध्ये गेल्यावर शिकारीऐवजी वन्यजीवांचे प्रेम, काळजी, जिव्हाळा असे छायाचित्र टिपण्याचा त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यांनी मानसिक व्यवस्थापन आणि छायाचित्रण याविषयावर काम सुरु केले आहे.

दंतरोग तज्ज्ञ डॉ. सीमा रविकिरण पाटील या पक्षीमित्र म्हणून परिचित आहेत. वडिलांसोबत लहानपणी केलेल्या भटकंतीतून खूप मोठ्या जगाची त्यांना जाणीव झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

photography day
Wildlife photography: छंद जोखमीचा पण रोमांचक; पाहा हे सुंदर फोटो

त्यांचे पती जंगलप्रेमी आहेत. विवाहानंतर पतीसोबत फिरताना जंगल आणि प्राणी यांच्याविषयी आस्था व प्रेम निर्माण झालं. कधी वाघ पाहिला, तर अनेकदा पक्षी पाहिले आहेत. हा आनंद इतरांना द्यावा म्हणून त्यांनी छायाचित्रणाला सुरवात केली. लहानशा पॉइंट ॲण्ड शूट कॅमेऱ्‍यापासून ही सुरवात झाली.

पक्षीप्रेमामुळे नांदूरमध्यमेश्‍वरला त्या माहेर मानतात. आगामी काळात निरीक्षणासोबत सांस्कृतिक, नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्याचा संकल्प त्यांनी केलाय. श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाच्या शिक्षिका संजना काजवे या १० वर्षांपासून छायाचित्रण करत आहेत.

अभ्यासाचा विषय प्राणिशास्त्र असल्याने निसर्गाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. जळगावचे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांच्या निसर्गमित्र समूह आणि विश्वरूप राहा यांच्या संपर्कातून पक्षीनिरीक्षणाची त्यांच्यात आवड वाढली. त्यांना एकदा युरोपातून स्थलांतरित केलेला पक्षी घराच्या खिडकीत दिसला. त्याचे त्यांनी छायाचित्र टिपले.

त्यांच्या कर्णबधिर क्षेत्रातील शोधनिबंध आणि पोस्टरला पुरस्कार मिळाले आहेत. सीमा तंगडपल्लीवार या गृहिणी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत पक्षीनिरीक्षण आणि निसर्गाचा आनंद घेत आहेत.

photography day
World Photography Day 2022: काय आहे इतिहास अन् कधी साजरा केला जातो हा दिवस

त्यांना कॅमेऱ्यातील पहिला ‘रोल’ १९९२-९३ मध्ये आईने दिलेला होता. त्यानंतर त्यांनी ऑटो डीजिलट कॅमेरा घेतला.

प्रवासात तो कॅमेरा हरवल्यावर दुसरा कॅमेरा घेतला. २०११ मध्ये नाशिक या निसर्गरम्य शहरात वास्तव्याला आल्या. कॅमेरा घेतल्यावर त्यांना पहिले छायाचित्र दयाळ पक्ष्याचे टिपले होते. कचरा, निर्म्याल्यातून कलाकृती, रांगोळी, सायकलिंग, बॅडमिंटन, भटकंती आणि लिखाण करणे हा त्यांचा छंद आहे.

‘डॅग्युरिओटाइप’चा शोध

फ्रान्समध्ये जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे या दोघांनी ‘डॅग्युरिओटाइप’चा शोध लावत छायाचित्रणाची प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच ॲकॅडमी ऑफ सायन्सने १९ जानेवारी १८३७ ला अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी करून जगाला भेट दिले. त्यामुळे जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो.

photography day
Micro Photography : मुंगीचा जवळून काढलेला फोटो पाहिला का? अक्षरशः अंगावर काटा येईल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.