World Tourism Day: माझ्या नाशिकचं पर्यटन काल अन् आज!

Godavari river nashik
Godavari river nashikesakal
Updated on

"जागतिक पर्यटन दिन बुधवारी (ता. २७) सर्वत्र साजरा केला जातोय. त्याच अनुषंगाने नाशिककरांनी पर्यटनाच्या संबंधाने विचारमंथन करणे गरजेचे आहे. शहराला धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. रामायणातील काही घटनांचे इथे दाखले दिले जातात. त्याअनुषंगाने धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नाशिक हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे, हे सांगायला नको. त्याचवेळी निसर्गाने नटलेल्या भौगोलिक परिस्थितीचा वारसा आपल्याला लाभलेला आहे." - शेखर गायकवाड (आपलं पर्यावरण संस्था)

(World Tourism Day My Nashik tourism yesterday and today by shekhar gaikwad)

सिंहस्थ कुंभमेळा... धार्मिक पर्यटनाचा मोठा वारसा नाशिकला लाभलेला आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने जर नाशिक शहराच्या पर्यटनाच्या विकासाविषयी सखोल अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल.

धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून आपल्या शहराची पंचवटी, तपोवन, गोदावरीच्या काठावरची छोटी कलाकुसर असलेली मंदिरे ही शक्तिस्थळे आहेत. ज्यांच्यामुळे धार्मिक-पौराणिक स्थळ म्हणून नावलौकिक मिळाला आहे.

काही निसर्ग पर्यटनस्थळ‌ व गडकिल्ले आहेत. आजत्या स्थळांची परिस्थिती नेमकी काय आहे? खरंच का आपण त्या जागेची जपवणूक केली आहे अथवा काँक्रिटीकरण व औद्योगिकीकरणाच्या नावाखाली विकास, या चौकटीच्या पट्टीने झाकलेल्या डोळ्यांनी आपण या गोष्टींचा नाश केला आहे का?

मुळातच, खूप काही छान गोष्टी इथे चांगल्या प्रकारे होऊ शकल्या असत्या. ज्यामुळे पर्यटनाला अजून चांगला वाव मिळाला असता. पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे वाढून लोकांना चांगला रोजगार मिळाला असता.

नाशिकला भरभरून निसर्गाचा ठेवा मिळाला होता. त्याचा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने उपयोग करून घेता आला नाही. तपोवन ज्यामुळे शहराला पौराणिक ओळख मिळाली त्याची परिस्थिती काय आहे?

Godavari river nashik
World Tourism Day 2023 : 'जागतिक पर्यटन दिन' का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

अहो ! तपोवनात आल्यानंतर पर्यटक विचारतात, की तपोवन कुठे आहे? याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट ती कुठली म्हणा. तपोवनामुळे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळतात.

त्याचं नेमकं काय होतं? केवळ काँक्रिटीकरण करण्यावर भर दिला जातो. उदाहरण द्यायचं झाल्यास अधिक मागे न जाता आपण मागील कुंभमेळ्याच्या दृष्टीने विचार केल्यास काँक्रिटचे घाट बांधून आपल्या जीवनदायी गोदावरीला काही ठिकाणी नाला करून टाकलाय.‌

पर्यटनाला चालना देण्यासाठी कुठलाही दूरदृष्टिकोन नाही. आता तीन वर्षांत तपोवनातील एक चांगला निसर्गसंपन्न भाग हा पूर्णतः काँक्रिटीकरण करून सिटीलिंकचे स्थानक करण्यात आले. शहरामध्ये निळकंठेश्वर, नारोशंकर अशी काही ठिकाणी आहेत जिथं पर्यटक भेट देतात.

ही सारी परिस्थिती पाहाता, पर्यटनस्थळ म्हणून हळूहळू आपली ओळख पुसत चाललीय. नाशिक नियोजन नसलेल्या पद्धतीने वाढते आहे. अशा प्रकारे बकाल विकासाला इतरांप्रमाणे शहरवासीय जबाबदार आहेत.

शहरात फिरत असताना ओंघळवाणं दृश्‍य नजरेत येते. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पुरातन वास्तूची जोपासना होताना दिसत नाही. हे सर्व पाहून एक नाशिककर म्हणून जिवाची घालमेल होते.

Godavari river nashik
World Tourism Day 2023: भारताबाहेरही आहेत हिंदू मंदिरं; परदेशातल्या प्रमुख मंदिरांविषयी जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.