Nashik : तांबे चोरी प्रकरणी 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Criminals Arrested
Criminals Arrestedesakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : अंबड येथील कृष्णा उद्योग कंपनीमधून चोरण्यात आलेल्या तांब्याच्या प्लेटिंग जॉब (Copper Plating Job) प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. फिर्यादी राजेंद्र पवार यांच्या कृष्णा कंपनीमधून चोरट्यांनी कुंपण तोडून तांब्याचे जॉब चोरले होते. याबाबत उपनिरीक्षक संदीप पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सूर्यभान जयस्वाल (२१, रा. घरकुल चुंचाळे, मूळ. उत्तर प्रदेश ) आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. (worth 3 lakh stuff seized in copper theft case Nashik News)

उपनिरीक्षक उत्तम सोनवणे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने तो माल भंगार बाजारात जमीर मुल्ला अब्दुल्ला खान याला विकल्याचे कळल्याने त्यालादेखील ताब्यात घेण्यात आले. जमीर ने हा माल भंगार व्यावसायिक शिवसिंग देवीसिंग राठोडला विकल्याचे सांगितले. त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तर राठोडने सिन्नर येथील एसएसआरपी कंपनीत राजेंद्र चितळे याला विकल्याचे सांगितले. त्यालाही ताब्यात घेतल्यानंतर त्याने हे संपूर्ण तांबे तेथे असलेल्या भट्टीत वितळवलेले असल्याची माहिती दिली.

Criminals Arrested
ITI चे 3 विषयांचे एकत्रीकरण; ED, WCS आणि थेअरीची एकच 100 गुणांची परीक्षा

चोरी गेलेल्या २ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या तांब्यासह पोलिसांनी एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चितळे यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, श्रीकांत निंबाळकर, नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Criminals Arrested
नाशिक : वैश्विक ओळखपत्रावर एस. टी. बसमध्ये मिळणार सवलत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.