परीक्षा प्रवेशपत्रावर चुकीचे पत्ते ; दिवसभर केंद्र शोधण्यासाठी धावपळ

एका परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्रावरचे नाव चुकीच्या पद्धतीने असल्याचा पुरावा
nashik
nashiksakal
Updated on

सिडको : राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शनिवारी (ता.२५) होणाऱ्या परीक्षा केंद्रावरील नावे चुकीच्या पद्धतीने प्रवेशपत्रावर टाकल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची शनिवारी परीक्षा आहे. तिच्या प्रवेशपत्रावर हिंदू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दही चौक, सिडको, नाशिक, असा उल्लेख केला आहे. परंतु, सिडको परिसरात अशा कुठल्या प्रकारची शाळा व पत्ता नाही.


राज्य आरोग्य विभागाकडून २५ सप्टेंबर रोजी राज्यात विविध ठिकाणी परीक्षा होणार आहेत. त्यापैकी नाशिकमध्येदेखील अनेक शाळांमध्ये केंद्राची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, नेमके विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर शाळेचे नाव व पत्ते चुकीचे दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी दिवसभर केंद्र शोधण्यात त्यांचा दिवस वाया गेल्याचे चित्र दिसून आले. अखेर कसेबसे त्यापैकी काही जणांना केंद्र शोधण्यात यश आले. परंतु, राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण, असा प्रश्न परीक्षार्थी उपस्थित करताना दिसत आहे.

परीक्षार्थी अर्जाची फी भरून अर्ज सादर करतात. त्याकरिता अनेक दिवस अभ्यासही करतात. परंतु, परीक्षेच्या काही दिवस आधी आलेल्या प्रवेशपत्रावर अशा प्रकारची घोड चुकीमुळे त्यांचा परीक्षेवर विपरीत परिणाम होतो. त्याची जबाबदारी संबंधित विभागाने घेतली पाहिजे.
- योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.