परीक्षा अर्ज भरला गणिताचा, गुण जीवशास्‍त्राचे! अजब प्रकार

career
careeresakal
Updated on

नाशिक : परीक्षा अर्ज भरताना गणित (Mathematics) विषय नोंदविला असतानाही गुणपत्रिकेत जीवशास्‍त्र (biology) विषयाचे गुण दिल्‍याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. स्‍नेहल भूषण देशमुख या विद्यार्थिनीबाबत घडलेल्‍या या प्रकाराबाबत तिच्‍यासह पूर्ण कुटुंबाला मनस्‍ताप होत आहे. कनिष्ठ महाविद्यालय व शिक्षण मंडळातील त्रुटीचा फटका स्‍नेहलला बसला असून, तिला करिअर निवडीत अडथळा येत आहे.

कुटुंबियांकडून संताप व्‍यक्‍त

यंदा कोरोना महामारीमुळे बारावीच्‍या लेखी परीक्षा झाल्‍या नाहीत. मूल्‍यमापनाच्‍या आधारावर निकाल जाहीर झाला आहे. तत्‍पूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडे परीक्षा अर्ज दाखल केले होते. त्‍यात स्‍नेहलने गणित विषय भरला होता. मात्र, निकाल जाहीर झाल्‍यानंतर गुणपत्रिकेवर जीवशास्‍त्र विषय दाखविल्‍याने तिच्‍यासह कुटुंबियांकडून संताप व्‍यक्‍त होत आहे. स्‍नेहलला अभियांत्रिकी शाखेतून पुढील शिक्षण घ्यायचे असून, निकालातील त्रुटीमुळे तिच्‍या करिअरच्‍या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. चिंताजनक बाब म्‍हणजे यासंदर्भात तक्रार करून महिना उलटला असताना, महाविद्यालय व शिक्षण मंडळाकडून विशेष काही हाती लागलेले नाही. त्‍यामुळे तातडीने तिच्‍यासह असा प्रकार घडलेल्‍या अन्‍य विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळावी, अशी मागणी होत आहे.

career
अवघ्या 21 दिवसांचाच संसार तिच्या नशिबात होता...!

शिक्षणराज्‍यमंत्र्यांची दखल

शिक्षणराज्‍यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्‍याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात शिक्षण मंडळाला आवश्‍यक त्‍या सुधारणा करण्याच्‍या सूचना भ्रमणध्वनीद्वारे केल्‍या असल्‍याचीही माहिती मिळाली. मात्र, स्‍नेहल अद्यापही निकालातील सुधारणेच्‍या प्रतीक्षेत आहे.

career
'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.