नाशिक : कलगी आणि तुरा म्हणजे सन्मानाने पागोट्यात खोचायचा एक अलंकार. शाहिरी अभ्यासात कलगी-तुरा या परंपरेला वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे स्थान आहे. कलगी-तुरा परंपरेचा विकास, त्यातील अध्यात्म आणि लोकतत्त्व समजून घेऊन त्याचे शास्त्रीय सादरीकरण होय.
आदिवासी पाड्यावर कलगी-तुरा हटके असतो. त्यातील झिलक्या हे पात्र असते, हे अनेकांना माहिती नसते. डोंगरपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथील यशवंत बाबा बेंडकुळे हे गेल्या ५० वर्षांपासून हे पात्र साकारतात. (Yashwant Baba playing character of zhilkya in Kalgi Tura age seventy Nashik News)
यशवंत बाबांचा वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत असून ते ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. हातात तुणतुणे घेऊन स्वरांना साद देण्याचे काम ते करतात. शब्द पडून द्यायचा नाही, हे त्यांचे मुख्य काम असते. सवाल-जवाब सुरु असताना त्यांची भूमिका मोठी असते. स्वरांना साद देणारा म्हणजे झिलक्या अशी या पात्राची ओळख करून देता येईल.
पोवाडा,कलगी-तुरा, गोंधळ, भराड, तमाशा आदी लोककला प्रकारांमध्ये तुणतुणे हे तंतूवाद्य वापरले जाते. यशवंत बाबा गाणे गाताना हे वाद्य वाजवतात. हातात धरण्याइतकी जाड असलेली दोन-अडीच फूट लांबीची बांबूची काठी हातात घेऊन तिच्या तळाशी एक पोकळ लाकडी नळकांडे बसवलेले असते.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
त्याचा तळ कातड्याने मढवून काढतात. कातड्याच्या मध्यापासून ते बांबूच्या काठीच्या वरच्या टोकापर्यंत एक तार खेचून बसवतात. बांबूत खोचलेल्या छोट्याशा खुंटीस ती बांधतात. हे वाद्य डाव्या हातात धरून उजव्या हातातील एका बारीक, पातळ पण टणक अशा लाकडी काटकीने तार छेडून वाजविले जाते.
यशवंत बाबा महाराष्ट्रात कला सादर करण्यासाठी जात असत. पूर्वी कला सादर केल्यावर नारळ, टोपी आणि जेवण दिले जात असे. अनेकवेळा स्वखर्चाने प्रवास करावा लागत असे. कार्यक्रमासाठी मिळणारे मानधन अल्प असल्याने नवीन पिढी ही कला शिकण्यास तयार नाही.
"राज्यभर फिरून कला सादर केली. आताची पिढी कला जोपासण्यास तयार नाही. कला सादर करून मिळणारे मानधन कमी असल्याने कुणी शिक्षण घेण्यास तयार होत नाही. मोबाईलमुळे कलेला वाईट दिवस आलेत. ही कला जिवंत राहील का नाही, असा प्रश्न पडतो."
- यशवंत बाबा बेंडकुळे, कलावंत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.