Nashik News: महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात मूलभूत तत्त्वांची जोपासना करणे गरजेचे : प्रा. पिंगळे

yashwantrao chavan death anniversery
yashwantrao chavan death anniverseryesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात मूलभूत मूलभूत तत्त्वांची जोपासना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सेंटरचे सचिव प्राध्यापक अशोक पिंगळे यांनी केले ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृति दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (yashwantrao chavan death anniversary at Yashwantrao chavan centre nashik Latest Marathi News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

yashwantrao chavan death anniversery
Credai Shelter 2022 : पहिल्याच दिवशी १५ हजार नागरिकांची प्रदर्शनाला भेट

महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचे वातावरण आहेत ते पाहता महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे विचार आज समाजात जाणे फार गरजेचे आहे नैतिक सामाजिक आर्थिक मूल्यावर आघात केला जाईल त्या दिवशी समाज जिवंत राहू शकणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्र मध्ये आहे. मग अशा वेळेस जर आपल्याला या महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण पूर्व पदावर आणायचे असेल तर यशवंतराव चव्हाण यांचे विचार कार्यपद्धती राजकारणात व समाजकारणात आणावी लागेल असे ते बोलत होते.

यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिकचे संचालक राजेंद्र डोखळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर माणसाला जोडून ठेवणारा असा नेता पुन्हा होणार नाही असे प्रतिपादन देखील त्यांनी केले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संचालिका सुरेखा बोराडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.

यावेळी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या संगीता सुराणा व त्यांच्या सहकारी यशवंतराव तारांगण येथील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक चे युवा विभाग समन्वयक भूषण काळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश ढगे यांनी परिश्रम घेतले यावेळी यशवंत प्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

yashwantrao chavan death anniversery
Rajya Natya Compition : कसब पणाला लावून उभा केला ‘गावगाडा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.