नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलं अन् यशवंतराव चव्हाणांनी त्यांचं ऋण फेडलं; काय आहे किस्सा? जाणून घ्या

Yashwantrao Chavan Nashik loksabha: यशवंतराव चव्हाण यांनी आपला शब्द पाळला होता. यशवंतराव चव्हाण आणि नाशिककरांचा ऋणानुबंध हा पुढेही कायम राहिला.
Yashwantrao Chavan
Yashwantrao Chavan
Updated on

मुंबई- सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये काही जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यातील नाशिक हा एक मतदारसंघ म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तर या जागेसाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत एक रंजक जाणून घेऊया. माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्याशी तो जोडला गेलेला आहे.

यशवंतराव चव्हाण आणि नाशिकचा संबंध १९६२ मध्ये आला. देशातील स्थिती आणीबाणीची होती. चीनने भारताचा पराभव केला होता. अशा परिस्थिती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावलं. त्यांना संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. नेहरुंनी त्यांच्यावर दाखवलेला हा मोठा विश्वास होता. पण, दिल्लीत जाण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांना खासदार होणे आवश्यक होते. त्यावेळी नाशिकने त्यांना राजधानीत पाठवण्याचं काम केलं होतं.

Yashwantrao Chavan
Nashik Lok Sabha Constituency: भाजपकडून शिंदे सेनेला ‘गिव्ह ॲण्ड टेक' ऑफर! ठाण्याच्या बदल्यात हवे नाशिक; जागेवरून नवा ट्विस्ट

नाशिककरांनी यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध करुन दिल्लीमध्ये पाठवलं. यशवंतराव यांनी ही गोष्ट कधीही विसरली नाही. नाशिकमधील एका सभेत बोलताना यशवंतरावांनी लोकांना एक आश्वासनच देऊन टाकलं होतं. ते म्हणाले होते की, 'नाशिकचे ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही.' आश्वासन देऊन ते पूर्ण न करणाऱ्या नेत्यांसारखे यशवंतराव चव्हाण नव्हते. त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केलं.

Yashwantrao Chavan
Loksabha Election: आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल, काय घडलं नेमकं ?

संरक्षण क्षेत्राशी संबंधित मिग विमान कारखाना (हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड) नाशिकजवळील ओझर येथे सुरु करण्यात आला. नाशिकच्या विकासासाठी हा मोठा प्रकल्प ठरला. यशवंतराव चव्हाण यांनी आपला शब्द पाळला होता. यशवंतराव चव्हाण आणि नाशिककरांचा ऋणानुबंध हा पुढेही कायम राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.