नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ गुरुवारी (ता.२३) सकाळी साडे दहाला विद्यापीठ आवारात होणार आहे. सोहळ्यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी उपस्थित राहतील.
या समारंभात विद्यापीठाच्या एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. (YCMOU Open University convocation ceremony tomorrow nashik news)
प्रभारी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारतील, याबाबतची माहिती प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.
यंदा विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमातील एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाईल. यात ११७ विद्यार्थी दृष्टीबाधित आहेत. उपस्थितीबाबत सूचना संकेतस्थळावर आहेत. त्यानुसार औपचारिकता पूर्ण करावयाच्या आहेत. दीक्षांत समारंभास विद्यार्थ्यांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात उपस्थित राहायचे आहे, असे विद्यापीठाने कळविले आहे.
विभागीय केंद्रनिहाय विद्यार्थी असे-
पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती विभागीय केंद्राचे २४ हजार ५७१, औरंगाबादचे १५ हजार ४७०, मुंबईचे १० हजार २६५, नागपूरचे २० हजार ५२६, पुणे २५ हजार ३९०, कोल्हापूर १२ हजार ०५६, नांदेड २२ हजार ०७२ आणि नाशिक विभागीय केंद्राच्या २४ हजार ८८४ विद्यार्थांना समावेश आहे. एक लाख ६९३ पुरुष विद्यार्थी तर ५४ हजार ५४१ महिला विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तब्बल दोनशे ज्येष्ठांना पदवी
पदवीधारकात वयाची साठी ओलांडलेले तब्बल दोनशे विद्यार्थी आहेत. याशिवाय शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ४८ बंदीजनांचा समावेश आहे.
यामध्ये अमरावती ८, मुंबई २, नागपूर २७, नाशिक १० आणि कोल्हापूर विभागीय केंद्रातील एका बंदीजन पदवी प्राप्त करणार आहेत. ३९ विद्यार्थ्यांनी बीए, एक बी. कॉम, योग शिक्षक पदविकाधारक ४ आणि मराठी विषय घेऊन एमए करणारे ४ बंदीजन आहेत.
पदवीप्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र
समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान केले जाणारी प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यावर विद्यार्थ्याचे रंगीत छायाचित्र असणार आहे. याशिवाय क्यूआर कोड प्रमाणपत्रावर असून तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येणार आहे.
नवे प्रमाणपत्र पाणी अथवा अन्य द्रव पदार्थाने खराब होऊ नये, याची काळजी घेतली असून सहजासहजी फाटणार नाही, असा कागद वापरला आहे. विद्यापीठाचा लोगो या पदवी प्रमाणपत्रावर वैशिष्ट्यपूर्ण गोल्ड फॉइलमध्ये मुद्रित केला असून, प्रमाणपत्रात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक सिक्युरिटी फीचर्सचा समावेश केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.