नाशिक : YCMOUच्‍या रस्त्याची दुर्दशा

YCMOU Latest marathi news
YCMOU Latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात (YCMOU) राज्‍यभरातून विद्यार्थी, पालक येत असतात. याशिवाय विद्यापीठातील विविध सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्‍ती येत असतात.

मात्र, गंगापूर रोडवरील मुक्‍त विद्यापीठ फाटा ते विद्यापीठाचे प्रवेशद्वार या दरम्‍यानच्‍या रस्‍त्‍याची पावसामुळे (Rain) दुर्दशा झालेली आहे. या रस्‍त्‍याची तातडीने दुरुस्‍ती करावी, अशी मागणी विद्यापीठ अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (YCMOU Road damaged nashik latest marathi news)

YCMOU Latest marathi news
गावठाणातील अपूर्ण रस्त्यांच्या कामावरून Shivsena आक्रमक

यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांच्‍यामार्फत जिल्‍हा परिषदेकडे पाठपुरावादेखील सुरू आहे. शिवसेना उपतालुकाध्यक्ष बाळासाहेब लांबे यांनीही यासंदर्भात निवेदन देताना रस्‍ते दुरुस्‍तीची मागणी केली आहे.

मुक्त विद्यापीठ फाटा ते मुक्त विद्यापीठ प्रवेशद्वार दरम्‍यानचा रस्ता पूर्णपणे फुटला आहे. गोवर्धन शिवारात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असून, याच रस्त्याने विद्यापीठातील कुलगुरू, सर्व अधिकारी, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची ये- जा सुरू असते.

रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होते आहे. मंत्री किंवा महत्त्वाच्या व्यक्‍ती विद्यापीठात येणार असतील तर तात्‍पुरत्‍या स्वरूपात मलमपट्टी केली जाते. परंतु काही दिवसांनी रस्‍त्‍यात पुन्‍हा खड्डे पडत असल्‍याने सर्वांचे हाल होत आहेत.

या मार्गावरील शेतकरी बांधवांकरीता खराब रस्‍ता गैरसोयीचा आहे. त्यामुळे या रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करावी, अशी मागणी होत आहे. लवकरच दुरुस्‍ती झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारादेखील दिलेला आहे.

YCMOU Latest marathi news
पिकअपच्या धडकेत थोडक्यात बचावला वाहतूक पोलिस; तक्रार मात्र दाखल नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.