YCMOU : काळानुरुप शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो आहे. याचाच भाग म्हणून टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमांची अध्ययन सामग्री ऑडिओ बुकच्या स्वरूपात उपलब्ध केली जाणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदवीचे सर्व अभ्यासक्रमांची रचना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केली आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (YCMOU study material of courses will be made available in form of audio books nashik news)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शनिवारी (ता. १) ३४ वा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आगामी काळातील नियोजन, बदल आणि योजनांची माहिती दिली.
कुलगुरू डॉ. सोनवणे म्हणाले, की एमबीए या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता दहा हजारांपर्यंत वाढविली आहे. विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हे अभ्यासक्रम राबविले जातील.
पुस्तके व इतर अध्ययन सामग्री विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्ही सज्ज असणार आहोत. जानेवारी महिन्यापासून काही नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्याचे नियोजन आखले जाते आहे.
विद्यापीठातर्फे विद्यापीठांना पुस्तके व इतर डिजिटल स्वरुपातील अध्ययन सामग्री उपलब्ध केली जाते. यापुढे जाऊन ऑडिओ बुकच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे नोकरदार, कष्टकरी, गृहिणी अशा विविध घटकांतील विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन कामकाजासोबत अभ्यासदेखील करू शकतील. यातून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पन्नास हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देणार
शिक्षणाचा थेट संबंध हा रोजगाराशी असला पाहिजे, या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध शिक्षणक्रम उपलब्ध केले जातील. काही अकुशल घटकांना या शिक्षणक्रमातून कुशल बनविताना उच्चतम संधी उपलब्ध केल्या जातील. साधारणतः ५० हजार विद्यार्थ्यांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
विद्यार्थिसंख्या लाखापर्यंत होणार
सद्यःस्थितीत विद्यापीठात सुमारे पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, येत्या वर्षभरात या संख्येत सुमारे एक लाखापर्यंत वाढ करण्यावर भर राहील. पुढील पाच वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा परिवार दहा लाखांपर्यंत पोचविण्याचा मानस आहे. राज्यभरातील पारंपरिक विद्यापीठांनी नव्याने महाविद्यालयांना मान्यता दिल्या आहेत.
प्रत्येक विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या सरासरी २० ते २५ ने वाढलेली आहे. या महाविद्यालयांमध्ये मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्याबाबत विभागीय केंद्रामार्फत विचारविनिमय केला जातो आहे. येत्या काळात अभ्यास केंद्रांच्या संख्येत शंभरने भर घालण्याचा मानस असल्याचेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.