Nashik News : सरते वर्ष चांदवडकरांसाठी निराशाजनक अन आंदोलनाचे

चांदवड तालुकावासीयांसाठी २०२३ हे वर्ष निराशेचे अन् आंदोलनाचेच ठरले. गेल्या अनेक वर्षांतील सर्वांत मोठा दुष्काळ या वर्षी अनुभवायला मिळाला.
year of disappointing results for Chandwadkar nashik recap 2023 news
year of disappointing results for Chandwadkar nashik recap 2023 news esakal
Updated on

Nashik News : चांदवड तालुकावासीयांसाठी २०२३ हे वर्ष निराशेचे अन् आंदोलनाचेच ठरले. गेल्या अनेक वर्षांतील सर्वांत मोठा दुष्काळ या वर्षी अनुभवायला मिळाला.

कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या चांदवडमध्ये वर्षभर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे व सर्वच राजकीय पक्षांचे आंदोलने झालीत, तरीही ज्या मागण्यांसाठी आंदोलने झाली त्यातील एकही मागणी शेतकऱ्यांची वर्ष सरलं तरीही पूर्ण झाली नाही, हे वैशिष्ट्य.-भाऊसाहेब गोसावी (year of disappointing results for Chandwadkar nashik recap 2023 news )

वर्षभरातील चांदवडचे नाव देशपातळीवर घेतले गेले ते शरद पवारांनी चांदवड येथे येऊन कांदा निर्यात बंदीविरोधात केलेल्या आंदोलनामुळे. शरद पवारांच्या उपस्थितीत कांदा निर्यातबंदीला विरोध केला गेला. केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंद केल्यामुळे उत्पादकांनी भाव कमी झाल्याने संताप व्यक्त करीत लिलाव बंद पाडले व अचानक रास्ता रोको केले.

प्रहार संघटनेनेही दूध भावप्रश्नी गांधीगिरी करीत दुधाचे वाटप केले. यापाठोपाठ निर्यातबंदीप्रश्नी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जाब विचारण्यासाठी प्रहारचे नेते, कार्यकर्ते नाशिक येथील त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी नाशिक येथे गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा आंदोलनात उडी घेतली, तेही चांदवड येथे रास्ता रोको आंदोलनासाठी आल्याने सर्वच वातावरण पेटून निघाले.

मात्र केंद्र शासनाने अद्यापही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. नाफेड व एनसीसीएफमार्फत कांदा खरेदीचे आदेश दिले असले तरी चांदवड येथील केंद्राचा थांगपत्ताच लागत नाही. वर्षभर तालुकाभर सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला तो कांदा निर्यातबंदी अन् कांद्याची नाफेड व एनसीसीएफमार्फत केंद्र शासनाची कांदा खरेदी. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शोधूनही या दोन्ही संस्थांची खरेदी केंद्र सापडली नाहीत.

दुष्काळी परिस्थिती असतानाही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कांदा विक्रीचे लाखो रुपये आले, हाही वर्षभरातील संशोधनाचा विषय ठरला. सत्ताधारी पक्षातील आमदार व केंद्रीय मंत्र्यांनी मात्र कांदाप्रश्नी ठोस असे काही केले नाही. हिंदू जनआक्रोश मोर्चानेही या वर्षात तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले. याचबरोबर मराठा आंदोलनात चांदवड तालुका मागे नव्हता.

year of disappointing results for Chandwadkar nashik recap 2023 news
Nashik News : मांजराला दूध पाजणे पडले महागात; 20 इंजेक्शन घेण्याची वेळ

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सरत्या वर्षात होईल, असे वाटत होते. मात्र त्या झाल्याच नाहीत. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन तेथे सत्तांतर होऊन सत्ता महाविकास आघाडीने ताब्यात घेतली. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांत तरुणांना गावकऱ्यांनी संधी दिली.

चांदवड तालुक्यावर दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला आहे. या वर्षी मार्चमध्ये अवकाळी पाऊस, तर नोव्हेंबरला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपल्याने शेतकरी हवालदिल झाला. गेल्या अनेक वर्षांनंतर सर्वांत मोठा दुष्काळ या वर्षी अनुभवायला मिळाला. तालुक्यातील बहुतांश गावांत फेब्रुवारीत सुरू झालेले पाण्याचे ट्रॅंकर अजूनही सुरूच आहेत.

पिण्याच्या पाण्याचा व रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर होणारे हेच वर्ष, बागायतदार शेतकऱ्यांनाही मजुरीसाठी दुसऱ्या तालुक्यात व शहरात जायला लावणारेही हेच वर्ष. दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून भरविलेले कृषी प्रदर्शनही उल्लेखनीय ठरले.

पुणेगावचे पाणी शेवटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा

चांदवड तालुका अवर्षण प्रवणक्षेत्रात मोडतो. तालुक्यातील शेतीचा पाणीप्रश्न नेहमीच कळीचा मुद्दा ठरला, मात्र हा प्रश्न काही सुटत नाही. पुणेगावच्या पाण्याची प्रतीक्षा याही वर्षी कायम राहिली.

year of disappointing results for Chandwadkar nashik recap 2023 news
Nashik News : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 3 जागांचा पर्याय; पंचवटीतील जागेची करणार पाहणी

चांदवड तालुक्यातील प्रलंबित व रखडलेल्या प्रकल्पात पुणेगाव प्रकल्पाच्या डावा कालव्याची मंदगतीने सुरू असलेली कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम प्रलंबितच आहे. याशिवाय कालवा पालखेड पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करणे, ओझरखेड कालवा बांधकामासह सिंचनासाल हस्तांतरित करणे, ही कामे प्रलंबितच आहेत.

निवडणुकांसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

चांदवड नगर परिषदेची मुदत संपून सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला. तर जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणुकीची मुदत संपूर्ण दोन वर्षांचा कालावधी उलटला. येथे निवडणूक कधी लागेल, याकडे लक्ष ठेवून अनेक नेते, कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असून, त्यांचा हिरमोड होत आहे.

वर्षभरात तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे झाली. अनेक गावांत विकासकामांच्या माध्यमातून आमदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. जलजीवन योजनेच्या माध्यमातूनही अनेक गावांत कोट्यवधी रुपयांची कामे झाली. शेकडो कोटी रुपये खर्च करूनही तालुक्यातील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. जलजीवनची कामे झालेली गावे ही तहानलेलीच राहिल्याने तो कळीचा मुद्दा ठरला. कोट्यवधी रुपयांची कामे तालुक्यात होऊनही वर्षभरात एकही ठोस काम झाले नाही, हेही विशेषच.

चांदवड शहरातील अस्वच्छतेमुळे हे वर्ष शहरवासीयांना डोकेदुखीचे ठरले. शहरातील तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते अन् अनियमित पाणीपुरवठा नगर परिषदेचे मुख्याधिकारी बदलूनही ‘जैसे थे’च राहिला. हे वर्ष तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ठरले. सरत्या वर्षात प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांची बदली होऊन त्यांच्या जागी पुलकित सिंह नवे प्रांताधिकारी आले, तर तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या जागी मंदार कुलकर्णी यांनी कार्यभार स्वीकारला.

पोलिस निरीक्षकांचीही बदली होऊन कैलास वाघ नवे पोलिस निरीक्षक आले, तर गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या बदलीनंतर परिविक्षाधीन म्हणून आलेल्या लाड याही जाऊन त्यांच्या जागी मच्छिंद्र साबळे हे गटविकास अधिकारी झाले. तालुक्यातील इतरही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

year of disappointing results for Chandwadkar nashik recap 2023 news
Nashik News : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 3 जागांचा पर्याय; पंचवटीतील जागेची करणार पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.