Yeola APMC : बाजार समितीवर बनकर-पवारांचे वर्चस्व! येवल्यात भुजबळांचा अनपेक्षित निर्णय

Kisan Dhange as Chairman of Agricultural Market Committee in Yevala and Adv. NCP leader Dilip Khaire, youth leader Sambhaji Pawar and officials while felicitating Bapusaheb Gaikwad.
Kisan Dhange as Chairman of Agricultural Market Committee in Yevala and Adv. NCP leader Dilip Khaire, youth leader Sambhaji Pawar and officials while felicitating Bapusaheb Gaikwad.esakal
Updated on

Yeola APMC : अपेक्षित नावे व चर्चा फोल ठरवत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अनपेक्षित निर्णय घेत येथील कृषि बाजार समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे समर्थक किसन धनगे यांची तर उपसभापतीपदावर युवा नेते संभाजीराजे पवार याचे कट्टर समर्थक ॲड. बापूसाहेब गायकवाड यांना संधी दिली आहे.

भुजबळांनी नावे जाहीर केल्यानंतर या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Yeola APMC Bunkar Pawar dominated market committee Bhujbals unexpected decision nashik news)

येथील बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे भुजबळ, अंबादास बनकर व शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांच्या पॅनलला १३ जागा मिळाल्या आहेत.

त्यातच भुजबळ व पवार यांचे मनोमिलन आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने माजी आमदार मारोतीराव पवार यांच्या स्नुषा तर संभाजी पवार यांच्या भावजय व सर्वाधिक मतांनी पॅनेलमध्ये विजयी झालेल्या सविता पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.

ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे पुत्र संजय बनकर यांचेही नाव सभापती पदासाठी आघाडीवर होते. त्यातच भुजबळांनी सोमवारी नाशिक येथे भुजबळ फॉर्मवर नेते आणि नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेतली होती. त्यामुळे सस्पेन्स वाढला व निर्णयाकडे लक्ष लागले होते.

येथील संपर्क कार्यालयात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे, अंबादास बनकर, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, राधकिसन सोनावणे, अरूण थोरात आदींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली.

भुजबळांनी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांच्या मोबाईलवरून सभापतीपदासाठी किसन धनगे तर उपसभापती पदासाठी ॲड. गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर बाजार समिती कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

सभापती धनगे यांना सूचक म्हणून संचालक संजय बनकर तर उपसभापती ॲड. गायकवाड यांच्या अर्जावर सूचक म्हणून संचालक वसंत पवार यांच्या सह्या होत्या. मुदतीत सभापती व उपसभापती या दोन्हीही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबा महाजन यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kisan Dhange as Chairman of Agricultural Market Committee in Yevala and Adv. NCP leader Dilip Khaire, youth leader Sambhaji Pawar and officials while felicitating Bapusaheb Gaikwad.
Chandwad APMC : सभापती-उपसभापतींची बिनविरोध निवड; देवळ्यात ‘शेतकरी विकास’ची सत्ता

बाजार समिती कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन महाविकास आघाडीच्या घोषणा देण्यात आल्या. नवविर्वाचित सभापती धनगे व उपसभापती ॲड. गायकवाड यांचा दिलीप खैरे व संभाजी पवार यांनी सत्कार केला.

खैरे-पवार यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. संचालक सविता पवार, संजय बनकर, उषाताई शिंदे, वसंत पवार, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, सचिन आहेर, महेश काळे, अलकेश कासलीवाल, रतन बोरणारे, संध्या पगारे, संजय पगार, नंदू अट्टल, भरत समदडीया, अर्जुन ढमाले, कुसुम गायकवाड आदी उपस्थित होते.

विकासाला साथ देणार ः शिंदे

निवडीनतर विरोधी गटाच्या नेत्या, माजी सभापती उषाताई शिंदे यांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, परंतु बाजार समितीत विकासाला साथ देऊ अशी भूमिका व्यक्त केली. बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे, सहकार अधिकारी विजय बोरसे, बाबासाहेब हावळे यांनी निवडणूक कामकाजात सहकार्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राजेश भांडगे, ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, अमोल सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे, बाबासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, जितेंद्र जागीरदार, सचिन सोनवणे, सुमित थोरात आदी उपस्थित होते.

दिलीप खैरेंचे अचूक नियोजन

बाजार समितीच्या निवडणुकीच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी छगन भुजबळ यांनी त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांच्याकडे दिली होती. येथील राजकीय समीकरणे जुळवत त्यांनी एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळवलेच, पण आता सभापती-उपसभापती पदाच्या निवडीतही मोलाची भूमिका पार पाडली.

खैरेनी यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली आणि निवडणुकीत यशही मिळाल्याचे पहावयास मिळाले.

Kisan Dhange as Chairman of Agricultural Market Committee in Yevala and Adv. NCP leader Dilip Khaire, youth leader Sambhaji Pawar and officials while felicitating Bapusaheb Gaikwad.
Nashik News : नेट कनेक्शन न देताच दिले 2 हजाराचे बिल! BSNL चा ग्राहकाला झटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.