येवला (जि. नाशिक) : मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे येवलेकरांसाठी नवीन नाही. अनेकदा कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या आणि जनावरांनी नुकसान केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गुरूवारी (ता. २३) अशाच एका घटनेत दोन मोकाट वळूंच्या झुंजीचा थरार येवलेकरांनी अनुभवला.
दरम्यान, या झुंजीत तीन कारचे मोठे नुकसान झाले असून, एका व्यक्तीला सुदैवाने फार नुकसान झाले नाही. (yeola people experienced thrill of bull fight Nashik News)
शहरातील बुंदेलपुरा काळोखे गल्ली भागात दोन वळू एकमेकांशी भिडल्याने एकच दशहत माजली होती. या सैरावैरा झालेल्या वळूंनी बुंदेलपुरातील काळोखे गल्लीत धुमाकूळ घातला. बेधुंद होऊन सुरू असलेल्या या झुंजीत येथील रहिवासी श्री. बाबर यांना मोठी दुखापत होताहोता वाचले.
मात्र, त्याचवेळी या भागातील तीन कारचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये निरंजन परदेशी यांच्या ओमनी कारची काच फुटली व दरवाजाचे मोठे नुकसान झाले. तसेच, विलास कांबळे यांच्या सेंट्रो कारच्या दरवाजाचे आरसे तुटले, दरवाजा चेपला जाऊन मागील बंफरचे जास्त नुकसान झाले.
याशिवाय नरेंद्र बटाव यांच्या व्हॅगनर कारच्या दरवाजाचे नुकसान झाले आहे. स्थानिक तरुणांनी झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे वळू त्यांच्यावर धावत असल्याने अनेकांनी दुरूनच गंमत पाहणे पसंत केले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच भर वाहतुकीच्या रस्त्यातील फत्तेबुरूज नाक्यावर याच वळूंमुळे मोठी दुर्घटना घडूनही झुंज सुटण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यावेळी फटाके फोडुन, पाणी मारूनदेखील झुंज सुटत नसल्याने अखेर अनेक तरुणांनी एकत्र येत तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी झुंज सोडविली होती.
त्यावेळीही झुंजीचा थरार सुरू असताना स्थानिक रहिवासी भयभीत झाले होते. शहरात अनेक ठिकाणी अशा मोकाट जनावरांच्या झुंज होत असून, प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहरातील नागरिकांनी केला असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.