YIN Art Festival : ‘Hiphop- Bollywood’चा झटका अन्‌ लावणीचा तडका!

Contestants
Contestantsesakal
Updated on

नाशिक : लकब अन्‌ ठुमक्‍यांसोबत चेहऱ्यावरील मनमोहक छटांसह सादर झालेली लावणी... चेहऱ्यावरील हावभावांसह रसिकांच्‍या काळजाचा ठेका चुकविणारा लयबद्ध, तालबद्ध नृत्‍याविष्कार... असे डोळ्याचे पारडे फेडणारे सादरीकरण शुक्रवारी (ता. ११) अनुभवायला मिळाले. औचित्‍य होते, ‘सकाळ’च्या ‘यिन’ कला महोत्‍सवांतर्गत एकल नृत्‍य स्‍पर्धेचे. या वेळी हिपहॉप-बॉलिवूड डान्‍स शैलीतून लक्षवेधी सादरीकरण झाले. मराठमोळ्या लावणीने रसिकांची मने जिंकली. (YIN arts festival Solo and group dance competition nashik news)

esakal
esakal

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्‍या या स्‍पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी स्पर्धकांनी उत्‍साहात सहभाग घेतला. अगदी पहिल्‍या सादरीकरणापासून असलेला उत्‍साह अखेरच्‍या सादरीकरणापर्यंत कायम होता. स्‍पर्धकांनी विविध नृत्‍य शैलीत नृत्‍य सादर करताना परीक्षकांसह उपस्‍थित रसिकांचे लक्ष वेधले. परंतु, सर्वाधिक सादरीकरण हे लावणी नृत्‍य प्रकारातील राहिल्‍याने या मराठमोळ्या लोककलेची लोकप्रियता तरुणाईतही असल्‍याचे अधोरेखित झाले.

‘नभातून आली अप्‍सरा’, ‘मला परतीच्‍या झुल्‍यात झुलवा’, ‘मला जाऊ द्या ना घरी’ या लावण्यांवर झालेल्‍या सादरीकरणांना टाळ्या, शिट्यांच्‍या स्वरूपात दाद देण्यात आली. या वेळी बॉलिवूड, हिपहॉप या नृत्‍य शैलींतूनही स्‍पर्धकांनी सादरीकरण करताना स्‍पर्धेतील आपली दावेदारी मांडली. स्‍पर्धेत परीक्षक म्‍हणून द डान्‍स एक्‍स्‍ट्रीमचे संचालक दिनेश राठोड आणि धुळे येथून आलेले कोरिओग्राफर सिद्धार्थ आखाडे यांनी काम पाहिले. अवनी शुक्‍ल हिने सूत्रसंचालन केले.

‘मला जाऊ द्या ना घरी’ला वन्स मोअर

कडकडत्‍या विजेप्रमाणे पूनम आडोळे या स्‍पर्धकाने रसिकांसह परीक्षकांचे लक्ष वेधले. तिच्‍या या तडाखेबाज सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून ‘वन्‍स मोअर’ म्‍हणत पुन्हा सादरीकरणाची मागणी करण्यात आली. त्‍यानुसार व्‍यासपीठावर पूनमने पुन्‍हा एकदा लावणीवर ठेका धरताना उपस्‍थितांची मने जिंकली.

esakal
esakal
Contestants
YIN Arts Festival : रंग-रेषा रेखाटण्यात हरपली मुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.