YIN Election 2022- 23 : ‘यिन’ची 115 महाविद्यालयांत निवडणूक; येथे करा अर्ज

YIN Election
YIN Electionesakal
Updated on

नाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित ‘यिन’ नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत ‘यिन’ निवडणूक प्रक्रिया ९ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यात ११५ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याला विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण असलेली ही निवडणूक यंदा ऑफलाइन होणार आहे. (YIN Election 2022 2023 Yin election in 115 colleges Start of filling of candidature application nashik news)

esakal

राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील उमेदवार अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ‘यिन’ निवडणुकीत सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध शाखांचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांना ‘यिन’ निवडणुकीबाबत मार्गदर्शन करत आहेत. राज्यातील सर्व महाविद्यालयांत पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘यिन’ व्यासपीठ सज्ज झाले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्‍वगुण विकसित करताना त्‍यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात (यिन) या व्‍यासपीठाद्वारे केले जात आहे.

अशी आहे निवडणूक व मतदान प्रक्रिया

- ॲपच्या मदतीने ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मतदान करण्याआधी ‘यिन’चे ॲप प्रत्येक मतदाराने मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे. तसेच मतदान करताना ॲपचे स्वतःचे प्रोफाईल दाखविणे आणि महाविद्यालयाचे आयडी कार्ड सादर करणे. हे दोन पुरावे दाखवून मतदान करता येऊ शकते.
- मतदान हे महाविद्यालयातच ‘सकाळ-यिन’च्‍या अधिकृत मतपत्रिकेद्वारे मतपेटीत सर्वांन पुढे गुप्तपणे टाकून केले जाईल. महाविद्यालयामध्ये आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विद्यार्थी मतदान करतील.
- प्रत्‍येक महाविद्यालयातून प्राचार्यांच्‍या सहमतीने निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली जाईल. तसेच कोअर टीमचे दोन सदस्‍य, ‘सकाळ’चे एक कर्मचारी या निवडणुक प्रक्रियेत देखरेख करतील.
- महत्त्वाचे : अधिक माहितीसाठी ‘यिन’चे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे यांच्‍याशी ९०७५०१७५०८ या क्रमांकावर संपर्क साधवा.

YIN Election
Nashik News : नाशिक रोडला बेळगाव- कोल्हापूर युतीची चर्चा!

येथे कराल अर्ज

तुम्हाला महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचं नेतृत्व करायचंय? आजच यिनच्या महाविद्यालयीन निवडणुकीत उमेदवारी अर्ज खालील लिंकवर जाऊन भरा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.apglobale.yinforchange

गुगल प्लेस्टोरवरून Young Inspirators Network ॲप डाऊनलोड करा.

अधिक माहितीसाठी संपर्क - गणेश जगदाळे, सकाळ यिन, विभागीय अधिकारी, उत्तर महाराष्ट्र 9075017508

निवडणूक प्रक्रियेच्या तारखा अशा-

पहिली फेरी : ९ जानेवारी २०२३ (शहर)
१२ जानेवारी २०२३ (ग्रामीण)

दुसरी फेरी: १६ जानेवारी २०२३ (शहर)
१९ जानेवारी २०२३ (ग्रामीण)

नवीन ‘यिन’ मंत्रिमंडळाची स्थापना

३१ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वाय. बी. चव्हाण सभागृह, मुंबई येथे नवीन ‘यिन’ मंत्रिमंडळाची स्‍थापना होणार आहे. निवडणुकीतून विजयी उमेदवारांना राज्‍यपातळीवर नेतृत्‍व करण्याची संधी उपलब्‍ध होईल.

YIN Election
Niphad Sugar Factory : निफाड कारखानाच्या नूतनीकरणास आजपासून सुरवात
esakal

या महाविद्यालयांमध्ये निवडणुका

नाशिक शहरातील महाविद्यालये-

१) केटीएचएम महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक २) क्रांतिवीर वसंतराव एन. नाईक महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर, नाशिक ३) के. के. वाघ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, पंचवटी, नाशिक ४) के. के. वाघ प्रयोगजीवी कला महाविद्यालय, अमृतधाम, पंचवटी, नाशिक, ५) के. के. वाघ महाविद्यालय, आडगाव रोड, पंचवटी, नाशिक, ६) एम. जी. व्ही. पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेमेंट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, पंचवटी, नाशिक, ७) लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक,

८) ब्रह्मा व्हॅली आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, आडगाव नाका, तपोवन, नाशिक, ९) मविप्र समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, मखमलाबाद, नाशिक, १०) पुणे विद्यार्थिगृहाचे श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान व कला महाविद्यालय, म्हसरूळ, नाशिक, १०) एचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालय, नाशिक, ११) बीवायके वाणिज्य महाविद्यालय, नाशिक, १२) भोसला मिलिटरी कॉलेज, नाशिक, १३) सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक, १४) अशोका सेंटर फॉर बिझनेस अॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज, वडाळा, नाशिक,

१५) एम. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, सातपूर, नाशिक, १६) क. शां. को. वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सिडको, नाशिक, १७) गार्गी अॅग्रिकल्चर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सिडको, नाशिक, १८) ना. ग्रा. शि. प्र. मं. कला व वाणिज्य महाविद्यालय, सिडको, नाशिक, १९) जी. डी. सावंत कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीएस महाविद्यालय, नाशिक, २०) मविप्र समाजाचे वाणिज्य, व्यवस्थापन व संगणकशास्त्र महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक, २१) एन. एस. पी. एम. लेट बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिक रोड, नाशिक,

२२) आर. एन. सी. कला, जे. डी. बी. वाणिज्य व एन. एस. सी. विज्ञान महाविद्यालय, नाशिक रोड, २३) एसव्हीकेटी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळाली कॅम्प, २४) सौ. स्मिता हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड परफॉर्मिंग आर्टस अॅन्ड फॅशन डिझायनिंग, पंचवटी, नाशिक, २५) एम. व्ही. पी. एस. विधी महाविद्यालय, नाशिक, २६) नरहर बळवंत ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक, २७) नवजीवन विधी महाविद्यालय, सिडको, नाशिक

YIN Election
Gram Panchayat Election: उपसरपंचपदासाठी फिल्डींग सुरू; काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये रस्सीखेच
esakal

२८) एम. जी. व्ही. समाजश्री प्रशांतदादा हिरे विधी महाविद्यालय, पंचवटी, नाशिक, २९) लोकनेते गोपीनाथजी मुंडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, कॅनडा कॉर्नर, नाशिक, ३०) के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, पंचवटी, नाशिक,

३१) एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक, ३२) पुणे विद्यार्थिगृहाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हसरूळ, ३३) गुरू गोविंदसिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च सेंटर, वडाळा, पाथर्डी रोड, नाशिक, ३४) एम. व्ही. पी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक, ३५) जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च, गंगापूर रोड, नाशिक, ३६) मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड रिसर्च सेंटर, एकलहरे, ता. जि. नाशिक, ३७) वास्तुशास्त्र महाविद्यालय, एमव्हीपीएस वास्तुशास्त्र महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक,

३८) भुजबळ नॉलेज सिटीचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर अॅन्ड इंटिरिअर डिझाइन, मु. गोवर्धन, नाशिक, ३९) एमव्हीपीएस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक, ४०) एम. जी. व्ही. एम. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पंचवटी, नाशिक, ४१) एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक, ४२) मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी, एकलहरे, नाशिक, ४३) कर्मवीर दुलाजीनाना सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, गंगापूर रोड नाशिक.

YIN Election
Panchayat Samiti Election : आरक्षणाच्या गुंतागुंतीने इच्छुकांमध्ये द्विधावस्था

नाशिक ग्रामीण भागातील महाविद्यालये-

१) केपीजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी, २) एन. एस. पी. एम.चे कला व वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी, ३) कळवण एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कळवण, मानूर, ४) आदिवासी सेवा समितीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मानूर, ५) डांग सेवा मंडळाचे कला महाविद्यालय, अभोणा, कळवण, ६) एस. एन. जे. बी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदवड, ७) एम. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, वडनेरभैरव,

८) मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर, ९) एम. जी. व्ही. एम. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, हरसूल, १०) क्रांतिवीर व. ना. नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी, ११) एम. व्ही. पी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी, १२) एम. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, खेडगाव, दिंडोरी, १३) कर्मवीर रा. स. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर, दिंडोरी, १४) एम. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, वणी, दिंडोरी, १५) कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा,

१६) एम. व्ही. पी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव, १७) एम. जी. व्ही. एम. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, १८) एम. व्ही. पी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड, १९) के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य संगणक महाविद्यालय, भाऊसाहेबनगर, निफाड, २०) कर्मवीर ग. दा. मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निफाड, २१) के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, काकासाहेबनगर, निफाड, २२) के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय, चांदोरी, निफाड,

२३) एम. व्ही. पी. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर मिग, निफाड, २४) विश्वसत्य कला व वाणिज्य महाविद्यालय, ओझर मिग, निफाड, २५) एचएएल विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर टाउनशिप, निफाड, २६) के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य, महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, २७) एम. व्ही. पी. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सायखेडा,

२८) नूतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, २९) दादासाहेब बिडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, पेठ, ३०) महंत जमनादास महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, करंजाळी, ता. पेठ, ३१) एम. व्ही. पी. एस. के. ए. ए. एन. एम. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा

YIN Election
Nashik News : ‘मांडवा’च्या परंपरेस ग्रंथतुलेची जोड! वऱ्हाडी मंडळीस औषधी वृक्षरोपांची भेट

३२) एमजीव्हीएमचे समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नामपूर, ३३) श्री सप्तशृंगी कला व वाणिज्य महाविद्यालय, डांगसौंदाणे, ३४) एमव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय, ताहाराबाद, ३५) महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव कॅम्प, ३६) श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प, ३७) जेएटीएस कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय, मालेगाव,

३८) संदीप कला महाविद्यालय, झोडगे, ता. मालेगाव, ३९) श्री बळिराम मोतीराम पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय, दाभाडी, ता. मालेगाव, ४०) श्री स्वामी समर्थ कला महाविद्यालय, रावळगाव, ता. मालेगाव, ४१) एम.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, सोयगाव, ता. मालेगाव, ४२) एम.जी.व्ही.एम. कला महाविद्यालय, सौंदाणे, ता. मालेगाव, ४३) जेईएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड रोड, येवला, ४४) एम. जी. व्ही. एम. कला व वाणिज्य महाविद्यालय, येवला,

४५) विश्वलता महाविद्यालय, भाटगाव, येवला, ४६) स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालय, येवला, ४७) जीएमडी आर्ट्स, बी. डब्ल्यू. कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, सिन्नर, ४८) एस.बी.एस.एस.पी.एम. कला व वाणिज्य महाविद्यालय, दोडी (बुद्रुक), ४९) साने गुरुजी कला व वाणिज्य महाविद्यालय, बारागावपिंप्री, ५०) महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विंचूरदळवी, ता. सिन्नर, ५१) एम.जी.व्ही.एम. कला व वाणिज्य महाविद्यालय, सुरगाणा,

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

YIN Election
Mohammed Rafi Birthday: त्यांच्याकडे आहे रफींच्या 20 हजार गाण्यांचा खजिना! अर्धा पगार कॅसेट अन् रेकॉर्डरसाठी!

५२) केबीएच विधी महाविद्यालय, मालेगाव कॅम्प, ५३) ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर, ५४) सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, ५५) संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च सेंटर, महिरावणी, ५६) सर विश्वेश्वरया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचोली, ता. सिन्नर, ५७) एस.एन.जे.बी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चांदवड,

५८) एसएनडी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, येवला, ५९) संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, महिरावणी, नाशिक,६०) प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मोहू, ता. सिन्नर. ६१) औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, अंजनेरी, नाशिक, ६२) सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, अंजनेरी, वढोळी, ता.त्र्यंबकेश्वर-४२२२१३
६२) संदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, महिरावणी, त्र्यंबकरोड, ता.जि. नाशिक, ६३) एस.एम.बी.टी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, धामणगाव, ता. इगतपुरी.,

६४) एस.एन.जे.बी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चांदवड, ६५) के.बी.एच.एस.इन्स्टिट्यूट ऑफफार्मसी, मालेगाव कॅम्प, ६६) एमजीव्ही औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मालेगाव कॅम्प, ६७) लोकनेते डॉ. जे. डी. पवार औषधनिर्माणशास्त्र कॉलेज ऑफ फार्मसी, मानूर, ता. कळवण, ६८) एसएनडी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, बाभूळगाव, ता. येवला,

६९) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (महिला) चिंचोली, ता. सिन्नर, जि. नाशिक, ७०) ब्रह्मा व्हॅली, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर नाशिक, ७१) संदीप फाउंडेशनचे एसआयईएम अभियांत्रिकी महाविद्यालय, महिरावणी, नाशिक, ७२) येवला कृषी महाविद्यालय, येवला.

YIN Election
Nashik News : हजार किलोमीटरचा प्रवास करीत ते निघालेत अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.