नाशिक : योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच विषयावर डॉ. काजल पटणी यांच्याशी साधलेला संवाद...
डॉ. काजल पटणी गीत योगा ॲन्ड फिटनेस ॲकॅडमीच्या ओनर आणि इंटरनॅशनल योगा टीचर आहेत. एमए अर्थशास्त्र शिक्षण झालेल्या डॉ. पटणी यांना विवाहानंतर दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये त्रास व्हायला लागल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ट्विन्स असल्यामुळे अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला दिला. डॉ. काजल यांचे पती डॉ. पराग पटणी पेशाने होमिओपॅथिक तज्ज्ञ असून, त्यांनी पत्नीला योगाचे धडे शिकविले.
त्यामुळे डॉ. काजल यांना योगाचा इतका फायदा झाला, की त्यांना प्रेग्नेन्सीमध्ये होणारा त्रासही हळूहळू कमी होत नाहीसा झाला. तेव्हापासून त्यांना योगा करण्यासाठी एक प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी घर सांभाळून एम.ए. योगा आणि नंतर योगामध्ये डॉक्टरेट पदवी मिळविली. स्वतःच्या फिटनेसची काळजी घेत असताना दुसऱ्यांनाही फिट राहण्यासाठी मार्गदर्शन दर्शन करण्याऱ्या डॉ. काजल पटणी 14 वर्षांपासून सातत्याने योगाची प्रॅक्टिस करताय.
डॉ. काजल यांचे पती डॉ. पराग पटणी यांनी 2 हजाराहून अधिक आसने करत तब्बल साडेसव्वीस तास योगा करण्याचा गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यांच्यासोबतच त्यांची मुलगी यंगेस्ट योगा ट्रेनर आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ती योगा ट्रेनिंग देते. 1 मिनिटात 39 आसने करून गीनिज बुकमध्ये गीत पटणीने नाव नोंदविले आहे. तसेच त्यांचा लहान मुलगा आदित्यनेही एका मिनिटात 104 पुश-अप्स करून वर्ल्ड बुकमध्ये नाव नोंदविले आहे.
योगा केल्याने होणारे फायदे
सध्याच्या धावपळीच्या जगात आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या कमी करण्यासाठी किंवा तर समस्या उद्भवू नये यासाठी योगा करणे गरजेचे आहे. आपल्या बॉडीचे चार प्रकार आहेत. त्यात प्राण बॉडी, फिजिकल बॉडी, सायकिक बॉडी आणि मेंटल बॉडी या चारही प्रकारांवर योगा उत्तमरीत्या काम करतो. योगामुळे आपला स्टॅमिना वाढतो. शरीराची लवचिकता वाढते, तसेच सकारात्मक विचार यायला लागतात. आपले शरीर योगामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते. कोरोनानंतर लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.