नाशिकमध्ये घडली 'अशी ही बनवा बनवी'

Police
Policeesakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : अशी ही बनवा बनवी..! अशी ही बनवा बनवी..! अशीच काहीशी चित्रपटाला साजेशीच घटना जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपहरण झाल्याचा बनाव करीत संबधित मुलीने स्वतःचाच फोटो व्हाटसपवरील स्टेट्सला भावपूर्ण श्रध्दांजली वाहत कुटुंबियांची तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जायखेडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चोवीस तासात छडा लावला आणि सदर तरूण-तरूणीचे प्रेमप्रकरण उघडकीस आले.

असे म्हणतात ना, प्रेम हे आंधळ आणि बहिरेसुध्दा असते, गेल्या दीड महिन्यात फेसबुकवर झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. साक्री तालुक्यातील एक तरूणी जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ब्युटी पार्लरवर शिक्षण घेण्यासाठी येत होती. दीड महिन्यांपूर्वी फेसबुकवर चॅटिंग करत असतानाच जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका तरूणाशी मैत्री जमली बघता-बघता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

मुलगा नाशिक येथील सातपूरच्या एका नामांकित कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या मोबाईलवरील व्हाटसप स्टेट्सला मुलीचा फोटो तसेच भावपूर्ण श्रध्दांजली बघताच कुटुंबियांनी तात्काळ सदर मुलीला भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र मोबाईल स्विच ऑफ येत असल्याने शंकेला जागा मिळत होती.

तोच काही वेळातच एका अनोळखी भ्रमणध्वनीवरून मुलीने कुटुंबियांना फोन करीत माझे कोणीतरी अज्ञाताने अपहरण केले असून एका अंधारातील खोलीत डांबून ठेवल्याचे आश्रू डाहळत सांगत होती. कुटुंबातील सदस्यांनी सदर मुलीला धीर दिला आणि लागलीच जायखेडा पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला.

पोलीस प्रशासन मांगीतुंगी (ता.बागलाण) येथील कार्यक्रमात बंदोबस्तावर असतांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार नाना पाटिल व शरद बागल यांचे पथक तयार करून तातडीने सदर मुलीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. उपनिरीक्षक श्री.भदाणे यांनी संबंधित मुलीबाबत सखोल माहिती मिळवली होती.

Police
पोलिस महिलेच्या सजगतेमुळे वाचले एका इसमाचे प्राण

तांत्रिक तपासादरम्यान मुलगी नाशिक येथील सातपूर येथे असल्याचे आढळून येताच सातपूर पोलीसाच्या मदतीने संबंधित मुलीचा शोध घेतला. संबंधित मुलीने प्रियकराच्या मदतीने बनाव केल्याचे उघडकीस आले पोलिसांनी चोवीस तासात घटनेचा उलगडा करून संबंधित तरूण व मुलीला समज देऊन कुटुंबियांंच्या सुपूर्द केले.

"अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी पाल्यांना समूपदेशन करने गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणे अतिशय चुकीचे असून यामुळे सत्य घटनांवरही दुर्लक्ष होऊ शकते."

- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा.

"आम्ही सर्व आधिकारी व कर्मचारी मांगीतुंगी येथील कार्यक्रमात बंदोबस्तावर होतो. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित प्रेमयुगलाने केलेल्या बनावाची चोवीस तासात पोलखोल केली. भविष्यात कोणीही असा बनाव करुन पोलिसांचा वेळ वाया घालु नका खरोखर घटना घडली तर त्याचे गांभीर्य राहनार नाही."

- तुषार भदाणे, उपनिरीक्षक जायखेडा

Police
सातपूर MIDC परिसरात बिबट्याचा वावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()