Nashik News: समृद्धीवर वाहन उभे करून तरुणाने शेतात संपवले जीवन; 2 दिवसांपासून उभी होती बेवारस कार

समृद्धी लगतच्या शेतात असलेल्या कांद्याच्या चाळीत तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
Samriddhi highway abandoned car parked for 2 days
Samriddhi highway abandoned car parked for 2 daysesakal
Updated on

सिन्नर : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा टप्पा क्रमांक दोन मधील पाथरे शिवारात 40 वर्षीय तरुणाने समृद्धी लगतच्या शेतात असलेल्या कांद्याच्या चाळीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

सदर तरुणाची कार समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपासून संशयास्पद रित्या उभी होती स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. (young man ended his life in farm by parking vehicle on Samriddhi highway abandoned car parked for 2 days Nashik News)

भरत आनंदराव शिलेदार रा. देर्डे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याची टाटा टिगोर कार क्र. एमएच 15 जीए 1514 गेल्या दोन दिवसांपासून समृद्धी महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर उभी होती.

कदाचित बिघाडामुळे कार उभी असावी असे स्थानिकांना वाटत होते. मात्र दोन दिवस उलटूनही कार जागेवरुन हालत नसल्याने संशय बळावला. स्थानिक तरुणांनी या कार बाबत वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली.

त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण सोनवणे यांनी या कारची तपासणी केली असता सीटवर उघड्या ठेवलेल्या डायरीमध्ये ' मी घराच्या जवळ आत्महत्या करत आहे... पोलिसांनी शोध घ्यावा.. ' असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली.

पोलिसांनी काचेतूनच ही चिठ्ठी वाचली. त्यानंतर गाडीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता ती शिलेदार यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.

चिठ्ठीत आत्महत्या चा उल्लेख असल्यामुळे पोलिसांनी कोपरगाव पोलिसांना माहिती देत देर्डे शिवारात शोध घ्यायला सुरुवात केली. वावीचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांचे सह नातेवाईक देखील शोध मोहिमेत सहभागी झाले.

मात्र शोध लागत नसल्याने संशयावरून कार उभी असलेल्या ठिकाणापासून समृद्धी लगत असलेल्या शेतातील कांद्याच्या चाळीकडे पोलिसांनी मोर्चा वळवला.

त्यावेळी रमेश रामराव राहाणे रा. पाथरे यांच्या मालकीच्या शेतातील चाळीमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शिलेदार यांचा मृतदेह आढळून आला.

पाथरे गावात ग्रामदैवत श्री खंडोबाचा यात्रोत्सव सुरू असल्याने तीन दिवसांपासून राहाणे शेताकडे गेले नव्हते. त्यांचे शेत समृद्धीच्या दोन्ही बाजूला विभागलेले आहे. पलीकडच्या बाजूने जाण्यासाठी त्यांना अडीच अडीच किलोमीटर फिरून जावे लागते.

Samriddhi highway abandoned car parked for 2 days
Nagpur Crime News : भांडण सोडविण्यास गेला अन् मार खाऊन आला!

त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणीही चाळीकडे गेले नव्हते. चाळीत शिलेदार यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या समक्ष पोलिसांनी स्थळ पंचनामा करत मृतदेह खाली उतरवला.

दोन दिवसांपूर्वी आत्महत्येचा हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कारण मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत आला होता. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात सेवाविच्छेदन केल्यावर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला.

समृद्धी महामार्गावर एकाच जागेवर दोन दिवसांपासून कार उभी होती. मात्र समृद्धीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणे कडून याकडे दुर्लक्ष झाले . समृद्धीवर गस्त करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दल तैनात करण्यात आले आहे.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास गस्त घातली जाते असे रस्ते विकास महामंडळाकडून सांगन्यात येते. असे असताना समृद्धी महामार्गावर वाहन उभे करून एखादी व्यक्ती बाजूच्या शेतात जाऊन आत्महत्या करते हा प्रकार समृद्धीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

Samriddhi highway abandoned car parked for 2 days
Dhule Crime: लामकानीत बनावट कर पावत्या बनवित अपहार; गुन्हा दाखल होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.