...अन् तिसऱ्या प्रयत्नात त्याने मृत्युला कवटाळले | Nashik

suicide
suicideesakal
Updated on

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : कितीही संकटाचे आरिष्ट ओढावले तरी माणुस जगण्यासाठी धडपडत असतो. मृत्युच्या कल्पनेने सुध्दा थरकाप उडत असल्याने अखेरचा श्‍वास कुणालाच नको असतो. पण पिंपळगांव बसवंत परिसरातील एक तरूण मात्र जगाचा निरोप घेण्यासाठी गेल्या महिन्याभरापासुन तडफडत होता. आयुष्याचा शेवट करण्यासाठी त्याने यापुर्वी दोनदा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या समयसुचकचेमुळे तो बचावला. मनोरूग्ण असलेल्या त्या तरूणाने अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने कादवा नदी उडी घेऊन आज मृत्युला कवटाळले. (young man from Nashik committed suicide by jumping in river)

यापुर्वी दोनदा केला आत्महत्येचा प्रयत्न

जीवनाचा खरा आनंद हा तारुण्यात घेतला जातो. पण याच चचंल वयात एखादी विकृती माणसाच आयुष्य संपवते. पिंपळगांव येथील राकेश संजय आहेर (वय 26) या तरूणाचे अती तणावामुळे गेल्या वर्षेभरापासुन मानसिक स्वास्थ्य बिघडले होेते. मानसिक तोल ढासळल्याने तो मनोरूग्ण झाला. त्याच्या जीवनातील आनंदच हरपला होता. जगण्यापेक्षा मरणाची ओढ त्याला लागली. यातुन त्याने महिन्याभरापुर्वीच कादवा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तेथून जाणाऱ्या दोन तरूणांनी त्याचा बचाव केला. तर चार दिवसांपूर्वी पिंपळगांवच्या स्मशानभुमीत जळत्या चितेत स्वतःला झोकुन देण्याच्या प्रयत्नात असताना राकेशला नागरिकांनी रोखले होते.

suicide
सत्तेसाठी फडणवीसांचा जीव गुदमरतोय, 'या' नेत्याने केली टीका

अन् त्याने आज मृत्युला कवटाळले...

जगण्याचा तिटकारा आलेल्या राकेशने आज दुपारी बारा वाजता पुन्हा कादवा नदीचा पुल गाठला. पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या कादवा नदीत स्वतःला मरणाच्या दारात ढकलले. उडी घेतल्यानंतर काही काळाने त्याचा मुतदेह पाण्यावर तरंगतांना नागरिकांना दिसला. मृतदेह बाहरे काढल्यानंतर तो राकेश आहेर असल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने मृत्युला कवटाळले आहे. पिंपळगांव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

suicide
पोलिसांची अजब तऱ्हा; ‘आपलं ते पोरगं, दुसऱ्याचं ते कार्टं’| Nashik

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()